शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकला हवे आणखी दोन टीएमसी पाणी

By admin | Updated: May 14, 2017 00:02 IST

महाराष्ट्राकडे मागणी : अद्याप निर्णय नाही

लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : कर्नाटकात विजापूर परिसरात पाणीटंचाईमुळे कोयना धरणातून आणखी दोन टीएमसी पाणी सोडण्याची मागणी कर्नाटकने केली आहे. एप्रिल महिन्यात कर्नाटकसाठी दोन टीएमसी पाणी सोडल्यानंतर आणखी दोन टीएमसी पाण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.कर्नाटक सीमाभागात जानेवारीतच कृष्णा नदीपात्र कोरडे पडल्याने कर्नाटकातील उगार कुडचीसह परिसरात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. बेळगाव जिल्ह्यातील भाजपचे खासदार व आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कर्नाटकसाठी कोयना धरणातून पाणी सोडण्याची मागणी केल्यानंतर एप्रिल महिन्यात पाणी सोडण्यात आले. मात्र सध्या विजापूर परिसरात पाणीटंचाई तीव्र झाल्याने कर्नाटक शासनाने आणखी दोन टीएमसी पाणी सोडण्याची मागणी महाराष्ट्र शासनाकडे केली आहे. कोयना धरणात पाणीसाठी अपुुरा असल्याने कर्नाटकला पाणी सोडण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. म्हैसाळ योजना सुरू असल्याने सांगली जिल्ह्यात सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा सुरू आहे. चार महिन्यात म्हैसाळसाठी पाच टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. जूनअखेर म्हैसाळचे आवर्तन सुरू राहणार असल्याने पाणीसाठ्याच्या वापराचा ताळमेळ घालून कर्नाटकला पाणी सोडण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. शुल्काऐवजी पाणीकर्नाटकाला सोडलेल्या पाण्यासाठी शुल्क आकारणी न करता कर्नाटकातून जत व अक्कलकोट परिसरात पाणी सोडण्यात येणार आहे. गतवर्षी व चालूवर्षी दिलेले पाणी अद्याप कर्नाटकाकडून परत मिळालेले नाही.