शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरला पाणी देण्यास कर्नाटक तयार

By admin | Updated: May 4, 2016 00:51 IST

पाटबंधारेची माहिती : कर्नाटकला आणखी एक टीएमसी देण्यास सुरुवात

सांगली : चांदोली (वारणा) आणि कोयना धरणातून कर्नाटकला मागील आठवड्यात पाच दिवसात एक टीएमसी पाणी दिले आहे. आता पुन्हा महाराष्ट्राने मंगळवारपासून कर्नाटकला राजापूर बंधारा येथून एक टीएमसी पाणी मोजून देण्याचा निर्णय घेतला आहे. या मोबदल्यात कर्नाटक सोलापूर जिल्ह्यासाठी कृष्णा नदीवरील नारायणपूर धरणातून (जि. बागलकोट) दोन टीएमसी पाणी देण्यास तयार झाले आहे. गरज लक्षात घेऊन पाणी घेणार असल्याचेही पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.कर्नाटकातील नदीकाठावरील कुडची, उगार, जुगूळ, शिरगुप्पी, ऐनापूर, कृष्णाकित्तूर यांसह अनेक गावांतील कृष्णा नदीवरील नळपाणी योजना पाणी टंचाईमुळे बंद होत्या. त्यामुळे कर्नाटक सरकारने पाणी देण्याची मागणी केली होती. त्यानुसार कर्नाटकला पाणी देण्यासाठी कोयना आणि वारणा (चांदोली) धरणातून मागील आठवड्यात दि. २५ ते ३० एप्रिल कालावधित एक टीएमसी पाणी सोडले आहे. त्यानंतर राजापूर बंधारा येथून पाणी सोडणे बंद केले आहे. पुन्हा कर्नाटक सरकारने आणखी एक टीएमसी पाणी देण्याची मागणी केली होती. सोलापूर जिल्ह्याला पाणी देण्याच्या अटीवर मंगळवारपासून कोयना व वारणा धरणातून कर्नाटकसाठी पाणी देण्यास सुरुवात केली आहे. राजापूर बंधारा येथून मोजून पाणी सोडण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या मोबदल्यात कर्नाटक सरकारने सोलापूर जिल्ह्यासाठी दोन टीएमसी पाणी देण्याचे मान्य केले आहे. टंचाई जाणवल्यानंतर लगेच कर्नाटक सरकारकडे पाण्याची मागणी करणार आहे. त्यानुसार त्यांनी पाणी सोडण्याची तयारी दर्शविली आहे, असेही सांगली पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)असे मिळणार पाणी...कर्नाटकमधील अलमट्टी धरणापासून ५० ते ६० किलोमीटर अंतरावर बागलकोट जिल्ह्यात कृष्णा नदीवर नारायणपूर धरण आहे. येथून दोन टीएमसी पाणी सोलापूर जिल्ह्याला मिळणार आहे. परंतु, सध्या भीमा नदीच्या पाण्यावर सोलापूरची गरज भागली आहे.