शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकला राजापूर बंधाऱ्यातून पाणी सोडले

By admin | Updated: April 14, 2017 00:07 IST

कोयनेतून तीन हजार क्युसेक विसर्ग सुरू, अडीच टीएमसी पाणी देणार

मिरज : कर्नाटकात सीमाभागातील गावात तीव्र पाणी टंचाईमुळे शिरोळजवळ राजापूर बंधाऱ्यातून गुरुवारी पाणी सोडण्यात आले. कर्नाटकसाठी कोयना धरणातून प्रतिसेकंद ३ हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत असून, २.६ टीएमसी पाणी देण्यात येणार आहे. राजापूर बंधाऱ्यातून प्रतिसेकंद १ हजार क्युसेक पाणी सोडण्यात येत असून, उद्या शुक्रवारी कुडचीपर्यंत पाणी पोहोचण्याची शक्यता आहे.राजापूर येथील बंधाऱ्यापुढे कर्नाटक हद्दीत कृष्णा नदी कोरडी पडली आहे. तीव्र पाणीटंचाईमुळे कोयना धरणातून चार टीएमसी पाणी सोडण्याची मागणी कर्नाटक पाटबंधारे विभागाने महाराष्ट्र जलसंपदा विभागाकडे केली होती. महाराष्ट्रात धरणे बांधताना कर्नाटकाला उन्हाळ्यात पाणी देण्याचा करार आहे. गतवर्षी एप्रिल महिन्यात कोयना व वारणा धरणातून कर्नाटकाला दोन टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. या दोन टीएमसी पाण्याच्या बदल्यात कर्नाटकने अक्कलकोट परिसरात पाणी सोडले होते. चांगल्या पावसाने वारणा व कोयना धरणात यावर्षी पुरेसा पाणीसाठा असल्याने महाराष्ट्रातून कर्नाटकला पाणी सोडण्याचा निर्णय झाला. कर्नाटकच्या मागणीबाबत जलसंपदा विभागाने सांगली पाटबंधारे विभागास पाणी सोडण्याचे निर्देश दिल्यानंतर गुरुवारी राजापूर बंधाऱ्यातून कर्नाटकसाठी पाणी सोडण्यात आले. कोयना धरणातून २.६ टीएमसी पाणी कर्नाटकात सोडण्यात येणार असून, सुमारे एक महिना राजापूर बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग सुरू राहणार असल्याचे पाटबंधारे अधिकाऱ्यांनी सांगितले. या पाण्याच्या बदल्यात कर्नाटकातून जत व अक्कलकोट तालुक्यात पाणी देण्यात येणार आहे. कर्नाटकला पाणी सोडण्यात येत असल्याने सांगली, मिरज परिसरात नदीच्या पाण्याची पातळी वाढली असून, पाणी प्रवाहित राहणार आहे. (वार्ताहर)कर्नाटकात पाणीटंचाईकर्नाटकात उगार व कुडची येथे नदीपात्रात पाण्याचा खडखडाट असल्याने नदीच्या दोन्ही काठावरील कुडची, उगार, जुगुळ, शिरगुप्पी, ऐनापुर, कृष्णाकित्तूर यासह अनेक गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. कृष्णा नदीवरील हिप्परगी धरणातील पाण्याने तळ गाठल्याने जमखंडी व बागलकोट परिसरात पाणी टंचाई आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने विहिरी व कूपनलिकांची पाणी पातळी खालावली आहे. पाणी टंचाईने त्रस्त सीमा भागातील ग्रामस्थांना महाराष्ट्रातून पाणी सोडण्यात आल्