शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील गुळाने कोल्हापूरच्या हंगामाचा श्रीगणेशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 00:46 IST

कोल्हापूर : गुळाचे आगर असलेल्या करवीर व पन्हाळा तालुक्यांना महापुराचा फटका बसल्याने गणेशचतुर्थीच्या निमित्ताने निघणाऱ्या हंगामातील पहिल्या सौद्याचा मान ...

कोल्हापूर : गुळाचे आगर असलेल्या करवीर व पन्हाळा तालुक्यांना महापुराचा फटका बसल्याने गणेशचतुर्थीच्या निमित्ताने निघणाऱ्या हंगामातील पहिल्या सौद्याचा मान पुणे जिल्ह्यातील गुळाला मिळाला. कागल तालुक्यातील व्हन्नाळी येथून काही प्रमाणात गूळ सौद्यासाठी आला. मुहूर्ताच्या पहिल्याच सौद्याला सहा हजार ५०१ रुपये असा विक्रमी दर मिळाला. विशेष म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा २० दिवस आधीच गुळाच्या हंगामाचा श्रीगणेशा झाला आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी सकाळी जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांच्या हस्ते व सभापती बाबासाहेब लाड, उपसभापती संगीता पाटील यांच्या उपस्थितीत सौदा काढण्यात आला. मुहूर्ताच्या पहिल्या १० किलोंचे ५१ रवे व्यापारी अतुल शहा यांनी साडेसहा हजार रुपयांना घेतले. उर्वरित गुळाला ३३०० ते ६५०१ रुपये असा दर मिळाला.कोल्हापुरातील गुळाच्या हंगामाची सुरुवात जरी दसºयापासून होत असली तरी गणेशोत्सवाच्या काळात पहिला सौदा काढून हंगामाचा श्रीगणेशा केला जातो. त्यानंतर १५-२० दिवसांनी हंगाम गती घेतो. गेल्या २५ सप्टेंबरच्या दरम्यान मुहूर्ताचा सौदा झाला होता. यावर्षी तो तब्बल २० दिवस आधी आला आहे.महापूरामुळे यावर्षी सौद्यासाठी परजिल्ह्यातून गूळ मागवावा लागला. दरवर्षी पुण्यातील कुंजीरवाडी येथील दत्तात्रय सावंत यांचा गूळ सौद्यासाठी येतो; पण तो महिनाभर आधीच कोल्हापुरात आला आहे. १० किलोंचे ६०० रवे सौद्यासाठी आणले होते. श्री भैरवनाथ अडत दुकानी सौदा निघाला. व्हन्नाळी येथील तानाजी जाधव व सागर जाधव यांच्या १० किलोंच्या ११०० गुळाच्या रव्यांचे सौदे बी. के. अतितकर यांच्या दुकानी निघाले.सौद्याच्या कार्यक्रमास संचालक कृष्णात पाटील, अमित कांबळे, सर्जेराव पाटील, दशरथ माने, उदयसिंह पाटील, आशालता पाटील, शेखर येडगे, संजय जाधव, शशिकांत आडनाईक, नंदकुमार वळंजू, सदानंद कोरगावकर, नेताजी पाटील, बाबूराव खोत, किरण पाटील, नानासो पाटील, सरदार पाटील यांच्यासह बाजार समितीचे सचिव मोहन सालपे, उपसचिव तानाजी मोरे, जयवंत पाटील आदि उपस्थित होते.