शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

करपलं रान देवा, जळलं शिवार...

By admin | Updated: July 17, 2015 00:09 IST

शेतकरी चिंताग्रस्त : पावसाच्या दडीने खरिपाची विस्कटली घडी; किडींचाही प्रादुर्भाव वाढला

कोल्हापूर : जिल्ह्यात तीन लाख ९३ हजार ८६९ पैकी तीन लाख ४८ हजार ३४४ हेक्टर क्षेत्रांवर खरीप हंगामासाठी विविध पिकांची पेरणी झाली आहे. एकूण ८८ टक्के क्षेत्रांवर पेरणी झाली आहे. मात्र, पावसाने ओढ दिल्यामुळे खरीप हंगाम संकटात आला आहे. पिकांची वाढ खुंटली असून, ते करपण्याच्या मार्गावर आहेत. सर्वच पिकांवर कमी, अधिक प्रमाणात हुमणी, पाने खाणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव वाढत आहे. तांबेरा आणि मावा किडीची लागण उसाला झाली आहे. दरम्यान, गुरुवारी दिवसभर शहर आणि जिल्ह्यात ऊन आणि तुरळक पावसाच्या सरी असे वातावरण राहिले. कोणत्याही क्षणी मोठ्या पावसाची संततधार सुरू होईल, अशी ढगांची गर्दी झाली होती. मात्र, पावसाने हुलकावणी दिली. यंदा उन्हाळ्यात वळवाने वारंवार हजेरी लावली. परिणामी जमिनीत खोलवर ओल निर्माण झाली. मॉन्सूननेही चांगली सलामी दिली. त्यामुळे शेतकऱ्यांनी पहिल्या टप्प्यात गतीने पेरणी केली. पहिल्याच आठवड्यात तब्बल पन्नास टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली. त्यानंतर पावसाची संततधार सुरू राहिल्याने पिकांची वाढ चांगली झाली. तथापि २६ जूनपासून संततधार पावसाला ब्रेक लागला. १ व २ जुलैला अल्प पाऊस झाला. पुन्हा पावसाचा खंड पडला. दुपारच्यावेळी कडाक्याचे ऊन पडत आहे. उष्णता प्रचंड वाढते आहे. दरम्यान, ९ ते १२ पर्यंत पश्चिमेकडील तालुक्यात पाऊस झाला. जिल्ह्यात ‘सर्वाधिक पावसाचा तालुका’ म्हणून ओळख असलेल्या गगनबावडा तालुक्यात दिवसातून एक-दोन पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत. उर्वरित तालुक्यांत पावसाने दडी मारली आहे.सर्वच पिकांना पावसाची अत्यंत आवश्यकता आहे. परिणामी शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे प्रतीक्षा करीत आहेत. खडकाळ जमिनीला भेगा पडल्या आहेत. पिके करपून जात आहेत. ढगाळ वातावरण राहूनही पाऊस पडत नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. शक्य तेथे शेतकरी पाणी देत आहेत. आणखी चार दिवस पाऊस पडला नाही, तर खरीप हंगाम पूर्णपणे धोक्यात येईल. महत्त्वाचे पीकनिहायपेरक्षेत्र हेक्टरमध्येभात :८५ हजार ४८४ज्वारी : ३ हजार ९४१नागली : १३ हजार ९६६मका : १६८७इतर तृणधान्य११८०तूर :२१३५मूग :११५८उडिद : ११२२इतर कडधान्ये : १३०२भुईमूग : ४१ हजार ७१०सूर्यफूल : १५कारळा ३४५सोयाबीन : ३८२८०भाजीपाला : १३९४ताग व अन्य ३२६८इतर चारापीकखडकाळ जमिनीतील पिके वाळत आहेत. ती कोमेजू नयेत म्हणून वारंवार मशागत करीत राहावे. चार दिवसांत जोरदार पाऊस न झाल्यास सर्वच पिके धोक्यात येण्याची भीती आहे. - चंद्रकांत सूर्यवंशी,कृषी विकास अधिकारीपावसाने ओढ दिल्यामुळे पिके धोक्यात आली आहेत. खरीप हंगाम संकटात आला आहे. पिकांची वाढ थांबली आहे. उर्वरित क्षेत्रातील पेरणी व भातरोप लागण ठप्प झाली आहे.- सुधीर कानडे, शेतकरी, दुंडगे (ता. गडहिंग्लज)पावसाने दमदार सलामी दिल्याने झटपट पेरणी केली. सुुरुवातील घातही चांगली मिळाली. त्यामुळे मशागतीची कामेही पूर्ण केली; पण आता पाऊसच नसल्याने पूर्ण हंगाम वाया जाण्याची भीती आहे. - के.आर.पाटील, शेतकरी, बेलवळे बुद्रुक (ता. कागल)चोवीस तासांतील पाऊस...गुरुवारी सकाळी आठपर्यंत झालेल्या चोवीस तासांत आजरा तालुक्यात १.३, चंदगडमध्ये २.८, भुदरगडमध्ये २, गगनबावड्यात ३, शाहूवाडी, राधानगरीत अनुक्रमे दोन मिलीमीटर पाऊस झाला आहे. उर्वरित तालुक्यात पाऊस पडलेला नाही.पाणीसाठाएकूण क्षमतेपैकी धरणातील पाणीसाठा टक्केवारीत असा: राधानगरी - ४६, तुळशी - ५१, वारणा-७१, दूधगंगा-४४, कासारी-६४, कडवी-५९, कुंभी-५०, पाटगाव-५५, चिकोत्रा - ३१, चित्री - ४३, जंगमहट्टी-५७, घटप्रभा-१००, झांबरे-७५, कोदे-१००.जूनमध्ये ३३७.७९जुलैला ७५७.३९आॅगस्टला ४७७.८८सप्टेंबरमध्ये १९९.३१आॅक्टोबरमध्ये १२६.६८