शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर  शहरात पावसाची उघडीप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 18:26 IST

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात रविवारी पावसाची उघडीप राहिली. दिवसभर खडखडीत ऊन पडले होते. ग्रामीण भागात मात्र पावसाच्या अधूनमधून सरी कोसळत राहिल्या. शाहूवाडी, गगनबावडा, राधानगरी, चंदगड, भुदरगड तालुक्यांत पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत.

ठळक मुद्देवारणाकाठी सतर्कतेचा इशाराग्रामीण भागात पावसाच्या अधूनमधून सरी धरणक्षेत्रातही पावसाचा जोर कमी

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात रविवारी पावसाची उघडीप राहिली. दिवसभर खडखडीत ऊन पडले होते. ग्रामीण भागात मात्र पावसाच्या अधूनमधून सरी कोसळत राहिल्या. शाहूवाडी, गगनबावडा, राधानगरी, चंदगड, भुदरगड तालुक्यांत पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत.

दोन दिवसांच्या तुलनेत रविवारी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी राहिले. सकाळी काही ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या; पण त्यानंतर खडखडीत ऊन राहिले. धरणक्षेत्रातही पावसाचा जोर कमी आल्याने धरणाची पाणीपातळी संथगतीने वाढत आहे.

राधानगरी धरण ९८ टक्के भरले असून, सध्या वीज निर्मितीसाठी प्रतिसेकंद २२०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कुंभी धरणक्षेत्रात चांगला पाऊस सुरू असून, सगळ्याच नद्यांचे पाणी पात्रात गेले आहे. पंचगंगेची पातळी २२ फुटांपर्यंत खाली आली असून अकरा बंधारे पाण्याखाली आहेत.

वारणाकाठी सतर्कतेचा इशारा

वारणा धरणक्षेत्रात फारसा पाऊस नसला तरी धरण ८८ टक्के भरल्याने आज, सोमवारपासून प्रतिसेकंद १६०० घनफूट पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना जिल्हाधिकाºयांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे.

धरणसाठा टी. एम. सी.मध्ये असा -

धरण क्षमता (टीएमसी) सध्याचा साठा टक्केवारी धरणक्षेत्रातील पाऊस

राधानगरी ८.३६१ ८.१६१ ९८ १९तुळशी ३.४७१ ३.१५६ ९१ ४वारणा ३४.३९९ ३०.४४१ ८८ १६दूधगंगा २५.३९३ १९.८६१ ७८ १०कासारी २.७७४ २.४५१ ८९ १०कडवी २.५१६ २.५१५ १०० १४कुंभी २.७१५ २.३५९ ८७ ४८पाटगाव ३.७१६ ३.०५८ ८२ १५चिकोत्रा १.५२२ ०.५०१ ३३ १०चित्री १.८८६ १.४७३ ७८ ५जंगमहट्टी १.२२४ १.२२४ १०० ५घटप्रभा १.५६० १.५६० १०० १८कोदे ०.२१४ ०.२१ १०० ४२