शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

‘काळम्मावाडी’तील पाण्याचे नियोजन हवे

By admin | Updated: March 16, 2017 01:01 IST

काटकसरीची गरज: १३.२९ टीएमसी पाणीसाठा

निवास पाटील ल्ल सोळांकूर काळम्मावाडी प्रकल्पाच्या दूधगंगा धरणात आजअखेर गतवर्षीच्या तुलनेत दुपटीपेक्षा म्हणजे १३.२९ टी.एम.सी. इतका पाणीसाठा आहे. मात्र, पावसाळ्यास तब्बल ३ ते ४ महिन्यांचा अवधी असल्याने पाण्याच्या नियोजनाचे वेळापत्रकानुसार वापर काटसकरीने होणे आवश्यक आहे. गतवर्षी पावसाने प्रमाणापेक्षा कमी हजेरी लावल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले नव्हते. मृत साठ्यातील पाण्याचा वापर करूनदेखील पाणीटंचाईचा सामना करावा लागला. पाण्याअभावी पिके होरपळली होती. उसाचे उत्पादन निम्म्याने घटले आहे. गतवर्षी पाण्याच्या नियोेजनाचे वेळापत्रक कोलमडले होते. पिण्याच्या पाण्याचे नियोजन करताना संबंधित विभागाची दमछाक झाली. आजअखेर धरणात १३.२९ टी.एम.सी. इतका पाणीसाठा आहे. गतवर्षी याच दिवशी ५.९१ टी.एम.सी. इतका पाणीसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत दुपटीपेक्षा अधिक पाणी असले तरी पाण्याची वाटप प्रक्रिया अधिक होणार आहे. कोल्हापूर थेट पाईपलाईनचे काम अंतिम टप्प्यात येत असल्याने शहरास पाणीपुरवठा केला जाणार आहे. डाव्या व उजव्या कालव्यांतर्गत ओलितास येणाऱ्या जमिनीचे क्षेत्र वाढले आहे. कर्नाटकला चार टी.एम.सी. पाणी देणे बंधनकारक आहे. याचा विचार करता भविष्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये म्हणून पाणी बचत व नियोजन होणे आवश्यक आहे. डाव्या व उजव्या कालव्याचे काम निकृष्ठ झाल्याने कालव्यांना गळती लागली असून, दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. कालव्यातून ४५० ते ५०० क्युसेस दाबाने पाणी सोडूनदेखील काही अंतरावर पाण्याचा दाब हा १०० क्युसेस असतो. भविष्यात होणाऱ्या पर्जन्यमान व पाणी वाटप प्रक्रियांचा विचार करून पाण्याचे नियोजन होणे काळाची गरज आहे.गतवर्षीचा विचार करता राधानगरी, तुळशी, वारणा यांचा उपयुक्त जलसाठा पाहिल्यास पावसाचे आगमन उशिरा झाले, तर पाणीटंचाईचा सामना करावा लागेल. राधानगरी परिसरात वृक्षतोड झाल्याने पर्जन्यमान कमी होऊ शकते, असे ज्येष्ठ व्यक्तींचे मत आहे.धरणाचे नाव आजचा पाणीसाठागतवर्षीचा पाणीसाठाटीएमसीटीएमसी१)राधानगरी३.१८३.२६२)तुळशी२.१४१.६९३)वारणा१४.४६१२.३७४)दूधगंगा१३.२९५.९१