शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

उष्म्यावर कलिंगडची थंडाई

By admin | Updated: February 15, 2015 23:46 IST

गवारी तेजीत : महाशिवरात्रीनिमित्त शाबूदाणा, बटाटा, वरीच्या मागणीत वाढ

कोल्हापूर : महाशिवरात्रीनिमित्त शाबूदाणा, बटाटा, शेंगदाणे, वरी यासह उपवासाच्या पदार्थांच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी झालेली दिसते. गेले आठ दिवस उष्म्यात वाढ झाल्याने फळांच्या मागणीत थोडी वाढ झाली आहे. उष्म्यावर कलिंगडची थंडाई घेण्यासाठी ग्राहकांच्या उड्या पडत आहेत. भाजीपाल्यांची आवक वाढल्याने दर काही प्रमाणात घसरले असले तरी गवारीचे दर वधारले आहेत. महाशिवरात्री उद्या, मंगळवारी असल्याने शहरातील लक्ष्मीपुरी, कपिलतीर्थ मार्केट, राजारामपुरी, गंगावेश बाजारात सकाळपासून ग्राहकांची गर्दी होती. विशेषत: रताळे, शाबूदाणा व वरीला मागणी होती. वरीचा प्रतिकिलो दर ७२ रुपये ते ८० रुपये, रताळे ४० रुपये, शाबुदाणा ७२ रुपये असा होता. तूरडाळीच्या दरात चार रुपयांनी वाढ झाली आहे. ती ९२ रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. बदाम-बी ८०० रुपयांवरून ८५० रुपयांच्या घरात गेली आहे. धान्य, तेलाचे दर स्थिर आहेत. भाज्यांची आवक वाढल्याने कोबी, वांगी, टोमॅटो, ओली मिरची, ढब्बू मिरची, ओला वाटाणा, कारली, भेंडी, वरणा, भेंडी, दोडका, फ्लॉवर या भाज्यांचे दर कमी झाले आहेत. कोथिंबीर स्थिर होती. घाऊक बाजारात कोथिंबीरचा दर ७०० रुपये (शंभर पेंढ्या) असा होता. मेथीची आवक घटली असली तरी ६०० रुपये (शंभर पेंढ्या) असा दर होता. रवे (गूळ) दरात प्रतिक्विंटल शंभर रुपये वाढले आहेत. आवक वाढल्याने द्राक्षांचे दर घसरले आहेत. किरकोळ बाजारात ६०, तर घाऊक बाजारात ४५ रुपये झाली आहेत. प्रतिकिलोला २० रुपये कमी झाले आहे. (प्रतिनिधी)काळ्या पाठीच्या कलिंगडची आवक फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळ्याच्या झळा जाणवू लागल्याने फळांना विशेष मागणी वाढली आहे. काळ्या पाठीच्या कलिंगडला ग्राहकांकडून मागणी जास्त होत आहे. या कलिंगडचा दर दहा रुपये तसेच पांढऱ्या पाठीचा दर २५ ते ३० रुपये असा होता. बाजारात कलिंगडच्या थप्पीच्या थप्पी लागल्या होत्या.कांदा वाढला; लसूण स्थिरगतआठवड्यापेक्षा या आठवड्यात कमी झालेल्या आवकेमुळे कांद्याच्या दरात वाढ झाली. दहा किलो कांद्याचा दर १४० रुपये झाला आहे. लसूण स्थिर असून, त्याचा प्रतिकिलो दर ४० रुपये असा होता.