शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

कागलला उसना शिवसैनिक नको

By admin | Updated: August 18, 2014 23:29 IST

उत्तम कांबळे : मुरगूडमध्ये ‘आरपीआय’चे शक्ती प्रदर्शन

मुरगूड : सदाशिवराव मंडलिक यांनी राजकीय वारसदार म्हणून आम्हाला पुढे करावे, विधानसभेसाठी उसना शिवसैनिक आणून आमच्यावर अन्याय करू नये, असे प्रतिपादन ‘आरपीआय’चे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी केले.मुरगूड (ता. कागल) येथे रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्यावतीने आयोजित मेळाव्यात ते अध्यक्षपदावरून बोलत होते. उत्तम कांबळे म्हणाले, जनता आमची, माणसे आमची; पण निवडणुकीत जय दुसऱ्यांचा हे आता चालू देणार नाही. प्रस्थापितांनी सत्तेच्या पोळ्या भाजण्यासाठीच आपल्या समाजाची प्रगती होऊ दिली नाही. मुश्रीफ यांनी फक्त विकासकामांचा कांगावाच केला. त्यांच्या गैरकारभाराचा पाढा कागलच्या गैबी चौकात व मुरगूडच्या तुकाराम चौकात वाचणार आहे. ‘आरपीआय’चे राज्य सचिव मंगलराव माळगे म्हणाले, मुरगूडमध्ये प्रस्थापितच रॅली काढत होते, मेळावे होत होते; पण आज आपल्या कार्यकर्त्यांनी मेळावा यशस्वी केला.प्रा. शहाजी कांबळे म्हणाले, भ्रष्टाचार, महागाई, अत्याचार, आदी बाबींसाठीच शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली.बबलू कांबळे, साहील गोरंबेकर, साताप्पा हेगडे, सीमा व्हनाळीकर, दिलीप कांबळे, रूपाली कांबळे, संजय लोखंडे, शोभा कांबळे, विश्वास सडोलकर, बाबासाहेब कागलकर, बाळासाहेब वाशिकर, विलास भामटे, अनिल माने, शामप्रसाद कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. बी. आर. कांबळे यांनी स्वागत तर नामदेव केनवडेकर यांनी प्रास्ताविक केले. (वार्ताहर)मातोश्रीचे दरवाजे बंद१९९८ ला संजय घाटगे शिवसेनेचे आमदार झाले. पुढील निवडणुकीत खुद्द बाळासाहेबांनी त्यांना सेनेची उमेदवारी दिली; पण ती त्यांनी नाकारली. यामुळेच बाळासाहेबांना यातना देणाऱ्या संजय घाटगे यांना मातोश्रीचे दरवाजे बंद असल्याचे साताप्पा सोनाळकर यांनी सांगितले.