कागल : कागल तालुक्यातील ४३ गावांसाठीच्या पोलीसपाटील पदाच्या भरतीसाठी शुक्रवारी आरक्षण काढण्यात आले. तालुक्यात आता १५ गावांत महिला पोलीसपाटील म्हणून दिसणार आहेत. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही आरक्षण प्रक्रिया प्रांताधिकारी मोनिका सिंह यांच्या उपस्थितीत झाली. तहसीलदार शांताराम सांगडे, नायब तहसीलदार शिवाजीराव गवळी, सरस्वती पाटील, आदी यावेळी उपस्थित होते. सुरुवातीला अनुसूचित जातीची लोकसंख्या गावच्या लोकसंख्येमध्ये जास्त प्रमाणात आहे, अशी सहा गावे या गटासाठी आरक्षित करण्यात आली. अनुसूचित जमातीसाठीही हीच पद्धत राबविण्यात आली. २०११च्या जनगणनेनुसार ही लोकसंख्या पाहण्यात आली, तर इतर मागास वर्ग भटक्या जमाती हे आरक्षण चिठ्ठीवर आणि उरलेले सर्वसाधारण अशी विभागणी करण्यात आली. त्यानंतर ३० टक्केप्रमाणे महिलांसाठी चिठ्ठ्या काढण्यात आल्या.आरक्षण आणि गावे पुढीलप्रमाणे : १) अनुसूचित जाती : क. सांगाव (महिला), मळगे बुद्रुक (महिला), कुरुकली, बस्तवडे, एकोंडी, करनूर २) अनुसूचित जमाती : बोरवडे (महिला), कुरणी (महिला), आणूर, तमनाकवाडा, कौलगे, बाणगे ३) इतर मागास वर्ग : केनवडे (महिला), अर्जुनवाडा (महिला), उंदरवाडी (महिला), मांगनूर (महिला), बामणी, करड्याळ, लिंगनूर दुमाला, सुरुपली, हमीदवाडा,सोनाळी, केंबळी, ठाणेवाडी, ४) भटक्या जमाती (क) : शेंदूर (महिला), बेलेवाडी काळम्मा. ५) भटक्या जमाती (ड) सावर्डे खुर्द (महिला), माद्याळ. ६) विशेष मागास प्रवर्ग : म्हाकवे (महिला), गोरंबे. ७) खुला : चौंढाळ (महिला), करंजिवणे (महिला), पिंपळगाव बुद्रुक (महिला), हसूर बुद्रुक (महिला), पिराचीवाडी, व्हन्नाळी, हसूर खुर्द, बेनिक्रे, खडकेवाडा, बेलेवाडी मासा, भडगाव, मळगे खुर्द.
कागल तालुक्यात १५ महिला पोलीसपाटील
By admin | Updated: November 23, 2015 00:23 IST