शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 ‘कागल’ने गमावलेली खासदारकी खेचून आणूया: संजय मंडलिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 00:02 IST

कागल : गेल्या लोकसभा निवडणुकीत विक्रमसिंह राजे गट आमच्या विरोधात होता. तेव्हा तालुक्यातून मला दहा हजार मतांचे मताधिक्य होते. ...

कागल : गेल्या लोकसभा निवडणुकीत विक्रमसिंह राजे गट आमच्या विरोधात होता. तेव्हा तालुक्यातून मला दहा हजार मतांचे मताधिक्य होते. आज वातावरण वेगळे आहे. राजे गट आमच्यासोबत आहे. त्यामुळे यावेळी कागल तालुक्यातून मोठे मताधिक्य मिळेल. कागलने गमावलेली खासदारकी परत खेचून आणण्यासाठी सज्ज राहा, असे आवाहन शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांनी केले.कागल शहरात मंगळवारी बसस्थानक ते गैबी चौक अशी भव्य पदयात्रा काढण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुणे ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, माजी आमदार संजय घाटगे, शिक्षण सभापती अंबरीश घाटगे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे, आर.पी.आय.चे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, आदी मान्यवर उपस्थित होते.आपल्या भाषणात माजी आमदार संजय घाटगे म्हणाले, ही लोकसभेची निवडणूक म्हणजे धनशक्ती विरुद्धची लढाई आहे. नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्याचा मार्ग उद्धवजी ठाकरे यांनी देशाला दाखविला आहे. पुणे ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे म्हणाले की, कागल तालुक्यात यावेळी भाजप-सेनेची हवा आहे.प्रा. संजय मंडलिक यांच्या विजयाचे निर्णायक मतदान कागल तालुक्यातील जनता करणार आहे. यावेळी महेश जाधव, उत्तम कांबळे यांचीही भाषणे झाली. स्वागत आभार राजेंद्र जाधव यांनी केले. यावेळी हर्षल सुर्वे, राजे बँकेचे अध्यक्ष एम. पी. पाटील, अतुल जोशी, बंडोपंत चौगुले, शिवाजीराव इंगळे, ईगल प्रभावळकर, बॉबी माने, शहराध्यक्ष अरुण सोनुले, सुलोचना साळोखे, विवेक कुलकर्णी, आदी मान्यवर उपस्थित होते.पवारांच्या सभेपेक्षादुप्पट गर्दीची सभा घेऊ...आपल्या भाषणात समरजितसिंह घाटगे म्हणाले की, गेल्या वेळी कागल शहरातून संजय मंडलिक यांना मते कमी मिळाली होती. ती भरपाई यावेळी करूच; पण जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य कागलमधूनच असेल. येत्या १९ तारखेला गैबी चौकात प्रचारसभा आहे. गैबी चौकात काही दिवसांपूर्वी शरद पवारांची सभा झाली. त्या सभेच्या दुप्पट गर्दी आमच्या सभेत असेल.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक