शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

शिरोलीत २४ पासून कबड्डी महासंग्राम

By admin | Updated: March 14, 2016 00:04 IST

आज लिलाव : नव्वद खेळाडूंची होणार निवड; दोन लाखांची बक्षिसे

शिरोली : शिरोली येथे कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्यावतीने २४ मार्चपासून भव्य कबड्डी महासंग्राम स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेत रोख व वस्तूंच्या रूपात सुमारे दोन लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत.कोल्हापूर जिल्ह्याला कबड्डीची मोठी परंपरा आहे. ग्रामीण भागासह शहरात हा खेळ चांगलाच लोकप्रिय आहे. गेल्या दोन वर्षांपासून राष्ट्रीय स्तरावर प्रो-कबड्डी आणि राज्यस्तरीय महाकबड्डी या व्यावसायिक स्पर्धा गाजत आहेत. यामुळे ग्रामीण भागातील लोप पावत चाललेली कबड्डी पुन्हा एकदा ऊर्जितावस्थेत आली आहे.याच व्यावसायिक धर्तीवर जिल्ह्यातील नवोदित खेळाडूंना आर्थिक पाठबळ मिळावे, ग्रामीण भागातील कबड्डी वाढावी या उद्देशाने जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने कोल्हापूर प्रीमियर लीग (केपीएल) कबड्डी महासंग्राम स्पर्धा शिरोली येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर २४ ते २७ मार्च दरम्यान होणार आहे. चार सिन्थेटिक मॅटवर एलईडीच्या प्रकाशझोतात हे सामने होतील. एकावेळी चार ते पाच हजार प्रेक्षक बसतील एवढी गॅलरी असणार आहे. आज, सोमवारी जिल्ह्यातील सुमारे तीनशे खेळाडूंमधून नव्वद खेळाडू लिलाव पद्धतीने घेतले जाणार आहेत. या स्पर्धेत विजयी संघांना एकतीस, एकवीस, अकरा आणि सात हजार रुपये रोख व चषक देण्यात येणार आहे. तसेच वैयक्तिक बक्षिसे एलईडी टीव्हीही देण्यात येणार आहेत. या स्पर्धेचे आयोजन शिरोली येथील एकवीरा असोसिएशन यांनी केले आहे. या स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सचिव संभाजी पाटील, रमेश भेंडेगिरी, दीपक पाटील, रघुनाथ पाटील, सचिन कोळी, विक्रम चव्हाण हे आयोजन करीत आहेत. (वार्ताहर)राष्ट्रीय पातळीवर नुकतीच प्रो-कबड्डी स्पर्धा संपन्न झाली. ग्रामीण भागात कबड्डीला चांगले दिवस आले आहेत. कोल्हापूरची कबड्डी संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे. या स्पर्धेची व्याप्ती वाढविण्यासाठी, जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये खेळाडूंना संधी मिळणार आहे. यातून खेळाडू लिलाव पद्धतीने घेतले जाणार आहेत. खेळाडूंना याचा फायदा होणार आहे. -प्रा. संभाजी पाटील - सचिव, कोल्हापूर कबड्डी असोसिएशनशिरोली ही कबड्डीसाठी पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या स्पर्धेसाठी नऊ संघ सहभागी झाले आहेत. प्रो-कबड्डीच्या धर्तीवर प्रथमच जिल्हा कबड्डी असोसिएशनच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. एलईडी प्रकाशझोतात या स्पर्धा होणार आहेत. सुमारे पाच हजार प्रेक्षक बसतील एवढी गॅलरी असणार आहे. रोख बक्षिसांबरोबरच एलईडी टीव्ही खेळाडूंना देण्यात येणार आहेत.-प्रा. रघुनाथ पाटील,एकवीरा असोसिएट्स