शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

कामाच्या ताणामुळे आत्महत्येचा प्रयत्न?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:59 IST

कोल्हापूर : कामाच्या अतिताणामुळे करवीर पंचायत समितीच्या आरोग्य विभागातील कनिष्ठ सहायक बाळकृष्ण शंकर गुरव (वय ४८, रा. कुर्डू, ता. करवीर) यांनी विषारी औषध प्राशन केल्यानंतर तुळशी नदीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला. यानंतर संतप्त झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या कर्मचाºयांनी हा प्रकार केवळ ...

ठळक मुद्दे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

कोल्हापूर : कामाच्या अतिताणामुळे करवीर पंचायत समितीच्या आरोग्य विभागातील कनिष्ठ सहायक बाळकृष्ण शंकर गुरव (वय ४८, रा. कुर्डू, ता. करवीर) यांनी विषारी औषध प्राशन केल्यानंतर तुळशी नदीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला. यानंतर संतप्त झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या कर्मचाºयांनी हा प्रकार केवळ ‘झिरो पेंडन्सी’च्या कामाच्या अतिरेकामुळे झाल्याचा आरोप करून वरिष्ठ अधिकाºयांचा निषेध करीत त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच ‘काम बंद आंदोलन’ जाहीर केले.‘झिरो पेंडन्सी’साठी गेले काही दिवस जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने कर्मचाºयांना रविवारची सुटीही दिली नाही. अशातच चार दिवसांपूर्वी या कामाच्या पाहणीसाठी पुण्याहून आलेले सहायक आयुक्त विलास जाधव यांच्या पाहणीनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी एका कर्मचाºयाला निलंबित केले, तर एकाला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली.जिल्'ातील सर्व पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत गेले महिनाभर केवळ हेच काम सुरू असल्याने कर्मचाºयांना सुटीच्या दिवशीही कामावर यावे लागत आहे. गुरव हे दोन दिवस तणावाखालीच होते. हे काम आपल्याला झेपत नसल्याचे ते सहकाºयांना सांगत होते. मात्र ‘आपण सर्वजण मिळून तुमचे काम करू,’ असे सांगून इतरांनी त्यांची समजूत काढली. रविवारी सकाळी गुरव हे घरातून साडेनऊ वाजता बाहेर पडले. तेथून माळ्याची शिरोली येथे सासुरवाडीला गेले. तेथून साडेदहा वाजता ते बाचणी येथील तुळशी नदीवर असणाºया बंधाºयाजवळ आले. तेथे त्यांनी मोटारसायकल लावली आणि ‘ग्रामोझोन’ या तणनाशकाचे प्राशन केले. ते पिऊन त्यांनी तुळशी नदीत उडी घेतली. तेथील शेतकºयांनी हा प्रकार पाहून त्यांना तातडीने नदीतून बाहेर काढून कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल केले. थोड्याच वेळात त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.विनाकारण कुणाचेही निलंबन होणार नाही‘झिरो पेंडन्सी’मध्ये कोल्हापूर जिल्ह्याने चांगले काम केले आहे. हे सर्व कर्मचाºयांचे योगदान आहे. मात्र ही निरंतर चालणारी प्रक्रिया असल्याने त्याचा ताण घेऊ नये. विनाकारण कुणालाही निलंबित करणे किंवा नोटीस देण्याचे प्रकार घडणार नाहीत अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी रविवारी दिली. -वृत्त/४