शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

जोतिबा मंदिर परिसरात सापडले ‘वीरगळ’

By admin | Updated: January 21, 2017 00:45 IST

११-१२ व्या शतकातील शिल्प : पाईपलाईनच्या खुदाईवेळी उघडकीस; पुरातत्त्व विभागाला माहिती देणार

कोल्हापूर : कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिराच्या बाह्य परिसरातील जोतिबा मंदिराच्या आवारात शुक्रवारी संध्याकाळी महापालिकेच्या वतीने पाईपलाईनच्या कामासाठी खुदाई सुरू असताना जमिनीखाली ‘वीरगळ’ हे शिल्प सापडले. सुस्थितीत असलेले, चार फूट उंचीचे हे शिल्प साधारण ११ व्या ते १२ व्या शतकातील आहे, अशी माहिती मूर्ती अभ्यासकांनी दिली.अंबाबाई मंदिराच्या घाटी दरवाजाच्या पुढे जोतिबा रोड आहे. येथे गेल्या तीन दिवसांपासून गटारींच्या चॅनेलसाठी महापालिकेकडून खोदकाम सुरू आहे. शुक्रवारी दुपारी साडेचारच्या दरम्यान एस. ओ. कन्स्ट्रक्शनचे सुपरवायझर संतोष चव्हाण यांच्यासह कर्मचारी जेसीबीने खुदाई करताना आधी दीड फूट उंचीचे एक दुभंगलेले शिल्प सापडले. त्यांनी दोरीच्या साहाय्याने दगड उचलण्याचा प्रयत्न केला; मात्र ते शक्य झाले नाही; त्यामुळे जेबीसी यंत्राच्या बकेटद्वारे हे शिल्प जमिनीतून बाहेर काढण्यात आले. परिसरातील नागरिकांनी हे शिल्प स्वच्छ केल्यानंतर ते ‘वीरगळ’ असल्याचे लक्षात आले. या वीरगळावर अत्यंत सुबक असे कोरीव काम असून, ते अजूनही सुस्थितीत आहे. नगरसेवक अजित ठाणेकर व पोलिसदेखील येथे दाखल झाले. महापालिकेच्यावतीने या शिल्पाची माहिती पुरातत्त्व खात्याला देण्यात येणार आहे, असे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सांगितले. बघ्यांची गर्दी आणि पूजायेथे मूर्ती सापडल्याची माहिती कळल्यानंतर बघ्यांची प्रचंड गर्दी झाली. शिल्प मोबाईलमध्ये टिपण्यासाठी प्रत्येकाची चढाओढ लागली होती. सदर शिल्प देवाचे आहे की अन्य कोणते, त्याचे महत्त्व काय याची शहानिशा करण्याआधीच त्याची दुधाने अभिषेक घालून हळदी-कुंकू, फुले वाहून पूजा करण्यात आली. सापडलेल्या शिल्पाची माहिती पुरातत्त्व खात्याला देण्यात येणार आहे. तोपर्यंत ते टाउन हॉल संग्रहालयाच्या आवारात ठेवण्याचे नियोजन आहे. आज, शनिवारी त्यावर योग्य तो निर्णय घेण्यात येईल. -सुरेश कुलकर्णी, जल अभियंताकाय आहे ‘वीरगळ’ वीरगळ म्हणजे युद्धात धारातीर्थी पडलेल्या वीराचे स्मृतिशिल्प. सापडलेले वीरगळ वीराचे असून त्याचे टप्पे खालून वर मोजतात. खालच्या पहिल्या टप्प्यात घोड्यावर बसून युद्ध करणारा वीर दर्शविला आहे. मधल्या टप्प्यात शहीद वीराला देवलोकांत घेऊन जाणाऱ्या अप्सरा दाखविल्या आहेत. अखेरीला पुरोहिताच्या साक्षीने शंकराची पूजा करून वीर कैलासात सालोक्य पावला, असे चित्रण या वीरगळात असते, अशी माहिती मूर्ती अभ्यासक अ‍ॅड. प्रसन्न मालेकर यांनी दिली.