शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

चैत्री यात्रेत जोतिबाचे एका तासात दर्शन

By admin | Updated: March 23, 2015 00:42 IST

‘लोकमत’च्या चर्चात्मक बैठकीत सर्व घटकांचा समन्वयाचा निर्धार

कोल्हापूर : दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या चैत्र यात्रेत भाविकांना उन्हात ताटकळत उभे राहावे लागू नये, यासाठी एका तासात देवदर्शनाची सोय करण्यात आली आहे. त्यासाठी गाभाऱ्यात दोन दर्शनरांगा करण्यात येणार आहेत. एकाचवेळी लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांनी स्वच्छता आणि स्वयंशिस्तीचा विचार करून यात्रा पार पाडण्यात जिल्हा, पोलीस प्रशासन, वाहतूक शाखा, ग्रामपंचायत व देवस्थान समितीला सहकार्य करावे, असे मत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. येत्या ३ एप्रिलला दख्खनचा राजा श्री क्षेत्र जोतिबा देवस्थानची चैत्र यात्रा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’च्या शहर कार्यालयात चर्चात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक आर. आर. पाटील, वाडी रत्नागिरीच्या (जोतिबा डोंगर) सरपंच रिया सांगळे, देवस्थान समितीच्या सचिव शुभांगी साठे, कनिष्ठ अभियंता सुयश पाटील, तहसीलदार प्रशांत पिसाळ, व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे, सहजसेवा ट्रस्टचे प्रमोद पाटील उपस्थित होते. ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले व मुख्य बातमीदार विश्वास पाटील यांनी मान्यवरांशी संवाद साधला. यावेळी जोतिबा मंदिर व यात्रेशी निगडित सर्व व्यवस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी यात्रेची तयारी, येणाऱ्या अडचणी आणि भाविकांकडून अपेक्षा, यावर ऊहापोह केला. दख्खनचा राजा श्री क्षेत्र जोतिबा देवस्थानच्या चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील ‘लोकमत’च्या शहर कार्यालयात चर्चात्मक कार्यक्रम झाला. यात वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक आर. आर. पाटील, व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे, सहजसेवा ट्रस्टचे प्रमोद पाटील, वाडी रत्नगिरीच्या (जोतिबा) सरपंच रिया सांगळे, ‘देवस्थान’चे कनिष्ठ अभियंता सुयश पाटील, सचिव शुभांगी साठे, तहसीलदार प्रशांत पिसाळ यांनी सहभाग घेतला.