शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
5
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
6
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
7
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
8
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
9
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
10
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
11
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
12
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
13
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
14
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
15
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
16
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
17
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
18
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
19
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
20
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
Daily Top 2Weekly Top 5

केवळ पंधरा दिवसांत ३७ हजार ८७0 आवकची निर्गत

By admin | Updated: July 6, 2017 01:08 IST

जिल्हा परिषद : विभागीय आयुक्तांकडून झिरो पेंडन्सीचा विषय गांभीर्याने

समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २0१५ची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर शासनाने गेल्या काही महिन्यांपासून भर दिला आहे. पुणे विभागाचे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी ‘झिरो पेंडन्सी’ हा विषय अतिशय गांभीर्याने घेतल्याने पुणे विभागातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये निपटारा मोहीम जोरात सुरू आहे. एकट्या कोल्हापूर जिल्हा परिषदेने १ जून ते १५ जून २0१७ या केवळ पंधरा दिवसांमध्ये ३७ हजार ८७0 आवक कागदपत्रे, अर्ज, प्रस्ताव यांची निर्गत लावली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार आणि प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी गेल्या महिन्याभरात लावलेल्या दप्तर तपासणी मोहिमेला आता यश येत असून, दोन्ही ठिकाणांच्या फाईल्स, प्रस्ताव, मागण्या, निवेदने यांना गती आल्याचे चित्र जिल्हाभर निर्माण झाले आहे. दळवी यांनी विभागीय आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ‘झिरो पेंडन्सी’ संकल्पना विभागामध्ये राबविणार असल्याचे जाहीर केले होते. तशी कार्यवाही सुरू केली. डॉ. खेमनार यांनी विविध विभाग आणि तालुका पंचायत समित्यांना अचानक भेटी देऊन कारणे दाखवा नोटिसा काढण्याचा सपाटाच लावल्याने सर्वत्र फाईल्स, प्रकरणांची निर्गत करणे, दप्तरामध्ये बांधून ठेवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या १७ विभागप्रमुखांकडे १ जून ते १५ जून या कालावधीत १६ हजार ४९४ प्रकरणांची, निवेदनांची, पत्रांची आवक झाली. त्यांच्याकडे आधीची ९८१ प्रकरणे शिल्लक होती. अशा एकूण १७ हजार ४७५ प्रकरणांपैकी १६ हजार ५१७ प्रकरणांची निर्गत लावली आहे. अजूनही ९५८ प्रकरणे शिल्लक असून, यामध्ये पहिल्या आठवड्यातील ३८२, दुसऱ्या आठवड्यांतील १८२, एक महिन्यातील २१४, तीन महिन्यात्ांील २५, सहा महिन्यांतील १२, सहा महिन्यांवरील दोन आणि एक वर्षावरील १३ प्रकरणांचा यामध्ये समावेश आहे. बारा गटविकास अधिकाऱ्यांकडे प्रारंभी ६९९ अर्ज शिल्लक होते. पंधरा दिवसांत त्यांच्याकडे २१४१६ नवीन प्रकरणे दाखल झाली. एकूण २२११५ पैकी २१ हजार ३५३ प्रकरणांची १५ दिवसांत निर्गत लावली. ‘सीईओं’कडून अशीही दिशाभूलजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी शिस्त लावताना काही वेळा ‘विधायक दिशाभूल’ ही केली आहे. आता चंदगड पंचायत समितीच्या दौऱ्यावर जाणार असल्याची चर्चा सुरू करायची आणि प्रत्यक्षात जिल्हा परिषदेच्याच कुठल्यातरी विभागाला अचानक भेट द्यायची. सर्व कर्मचाऱ्यांना दोन्ही बाजूंना उभे करून मध्ये दप्तर बांधणीचे प्रात्यक्षिकही दाखवायचे, अशा पद्धतीने काम केल्याने दप्तर बांधणी अद्ययावत होत आहे.सेवानिवृत्तीच्या प्रकरणात कोल्हापूर प्रथमजून २0१७ अखेर सेवानिवृत्तीची जी प्रकरणे आहेत ही सर्वाधिक प्रकरणे निर्गत करण्यामध्ये पुणे विभागातील पाच जिल्ह्यात कोल्हापूरने बाजी मारली आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेकडे १४१ प्रकरणे दाखल झाली होती. त्यातील ११८ प्रकरणांची निर्गत लावून ८४ टक्के काम करीत कोल्हापूर जिल्हा पहिला आला आहे.