शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ६ जून ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : संपूर्ण भारताचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांचा दिनांक ६ जून रोजी रायगडवर शिवराज्याभिषेक सोहळा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : संपूर्ण भारताचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांचा दिनांक ६ जून रोजी रायगडवर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतो. यापुढे हा दिवस ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून संपूर्ण राज्यात साजरा केला जाणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, रयतेच्या हिताचा कारभार कसा असावा, याचे सर्वोत्तम उदारहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला राज्य कारभार आहे. त्यांनी १७ व्या शतकात महाराष्ट्रात भूमीपुत्रांचे हिंदवी स्वराज्य स्थापन केले. या महापुरूषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्वाचा दिवस ६ जून १६७४, म्हणजे शिवराज्याभिषेक दिन होय. स्वत:च्या सार्वभौम स्वराजाचा पवित्र मंगलकलश जनतेला अर्पण करून रयतेची झोळी सुख, समृध्दीने भरली होती. याच पवित्र दिवशी शिवकालगणनेला प्रारंभ झाला होता. हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याची मागणी विविध स्तरातून करण्यात येत होती. त्यानुसार ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयात हा दिवस ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सकाळी ११ वाजता सर्व पदाधिकारी व कर्मचारी हे गुढी उभारून तिला अभिवादन करतील. महाराष्ट्र गीत, राष्ट्रगीताचे गायन झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर होईल. यावेळी कागलचे माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर उपस्थित होते.

कॅबिनेटचा विषय मुख्यमंत्र्यांच्या विचाराधीन

रायगड येथे राज्याचे कॅबिनेट व्हावे, अशी मागणी खासदार संभाजीराजे यांची आहे. हा विषय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विचाराधीन असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.