शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

आरक्षण दिले तर गूळ; नाही तर ‘कोल्हापुरी’; कोल्हापूरच्या दसरा चौकात भगवे वादळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 00:35 IST

कोल्हापूर : रविवार सुटीचा दिवस साधून कोल्हापूर शहर, उपनगर आणि ग्रामीण भागातून अनेक रॅली ‘मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे’ असा गजर करत दसरा चौकात एकत्र आल्याने चौकातील वातावरण भगवेमय झाले होते. भगवे झेंडे, भगव्या टोप्या, भगवी कपडे व भगव्या साड्या नेसून महिलाही मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाल्या होत्या. घोषणांनी ऐतिहासिक ...

कोल्हापूर : रविवार सुटीचा दिवस साधून कोल्हापूर शहर, उपनगर आणि ग्रामीण भागातून अनेक रॅली ‘मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे’ असा गजर करत दसरा चौकात एकत्र आल्याने चौकातील वातावरण भगवेमय झाले होते. भगवे झेंडे, भगव्या टोप्या, भगवी कपडे व भगव्या साड्या नेसून महिलाही मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाल्या होत्या. घोषणांनी ऐतिहासिक दसरा चौक दणाणला होता. विशेषत: जुना बुधवार पेठ आणि संयुक्त उपनगरच्या रॅलीने लक्ष वेधले. जुना बुधवारच्या कार्यकर्त्यांनी रॅलीतून आणलेले कोल्हापुरी चप्पल व गुळाच ढेप आकर्षणाचे केंद्र ठरली.मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी दसरा चौकात गेले बारा दिवस सकल मराठा ठोक मोर्चाच्यावतीने ठिय्या आंदोलन सुरू आहे.संयुक्त उपनगराचे शक्तिप्रदर्शनसानेगुरुजी वसाहत परिसरातील संयुक्त उपनगर मंचच्यावतीने रविवारी सकाळी क्रशर चौक आणि देवकर पाणंद या दोन ठिकाणांहून दुचाकी रॅली काढण्यात आली. नगरसेवक शारंगधर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली निघाली. रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून फिरून दसरा चौकात आली. त्यानंतर घोषणा देत सर्व कार्यकर्ते ठिय्या आंदोलनाच्या व्यासपीठावर आले. या रॅलीने शक्तिप्रदर्शन घडविले. रॅलीत भगवे झेंडे, भगव्या टोप्या परिधान केल्या होत्या. या रॅलीमध्ये नगरसेवक शारंगधर देशमुख, मनीषा कुंभार, दीपा मगदूम, रिना कांबळे, आदींचाही सहभाग होता.खुपिरे, साबळेवाडी, शिंदेवाडी बंदकरवीर तालुक्यातील खुपिरे, साबळेवाडी, शिंदेवाडी या गावांत ग्रामस्थांनी रविवारी मराठा आरक्षण मागणीसाठी सर्व व्यवहार बंद ठेवले. त्यानंतर या गावातून रॅली काढून घोषणा देत दसरा चौकात ठिय्या आंदोलनस्थळी येऊन सहभाग घेतला. यामध्ये खुपिरे सरपंच तानाजी पाटील, साबळेवाडी सरपंच सरदार पाटील, शिंदेवाडी सरपंच रेवती वडगावकर यांच्यासह कुंभी-कासारी साखर कारखान्याचे संचालक संजय बळवंत पाटील, शिवाजी गुरव, सर्जेराव पाटील, माजी सरपंच संजय पाटील, आदी सहभागी होते.यांनीही घेतला सहभागशिवाजी विद्यापीठ सेवक संघ, जुना बुधवार संयुक्त मंडळ, संयुक्त उपनगर मंडळ, बालगोपाल तालीम मंडळ, लेटेस्ट तरुण मंडळ, साळोखे फौंडेशन, कदमवाडी परिसर मंच, ब्राह्मण युवा मंच, कसबा सांगाव ग्रामस्थ (ता. कागल), कोतोली ग्रामस्थ यांनीही दसरा चौकात येऊन आंदोलनात सहभाग घेतला.आज मंगळवार पेठ एकवटणारसकल मराठा ठोक आंदोलनप्रश्नी मंगळवार पेठेतील सर्व नागरिक, तालीम मंडळांचे कार्यकर्ते व व्यापारी आज, सोमवारी मिरजकर तिकटी येथे सकाळी ११ वाजता आंदोलन करणार आहे. दुपारी एक वाजेपर्यंत हे आंदोलन होणार आहे. त्यामुळे सर्व व्यवहार या दोन तासांत बंद राहणार आहेत.इच्छा असेल तर प्रश्न सुटेल : चव्हाणकोल्हापूर : सरकारची प्रामाणिक इच्छा असेल तर मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकेल, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. दसरा चौकात सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनात आणि रास्ता रोको आंदोलनात माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी रविवारी सहभाग घेतला. त्याप्रसंगी ते व्यासपीठावरून बोलत होते. रविवारी कोल्हापुरात आत्महत्या केलेल्या विनायक गदगे कुटुंबीयांच्या दु:खात आपण सहभागी असल्याचे सांगून श्रद्धांजली वाहिली. मराठा समाजाने आत्महत्या करू नये. तसेच आंदोलन हे सनदशीर मार्गाने, संयमाने व कोणतेही गालबोट न लावता हाताळावे, असे आवाहन त्यांनी केले.संयुक्त जुना बुधवार पेठेची भव्य रॅलीकोल्हापूर : ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणा देत आणि भगवे ध्वज घेऊन संयुक्त जुना बुधवार पेठेतील नागरिकांनी रविवारी भव्य दुचाकी रॅली काढली. यावेळी दसरा चौकात सुरू असलेल्या सकल मराठा समाजाच्या ठोक आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला. मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर कोल्हापुरी चप्पल राज्यसरकारच्या डोक्यावर मारले जाईल आणि आरक्षण दिले तर कोल्हापुरी गुळाने त्यांचे तोंड गोड करू, अशा कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या.यावेळी माजी नगरसेवक धनंजय सावंत, दिगंबर फराकटे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी नगरसेविका सरिता मोरे, नगरसेवक अफझल पिरजादे उपस्थित होते. रॅलीत सुशील भांदिगरे, नागेश घोरपडे, उदय भोसले, हेमंत साळोखे, मकरंद स्वामी, सचिन क्षीरसागर, संदीप राणे, अमोल डांगे, प्रवीण डांगे, अभिजित बुकशेट, मधुकर पाटील, नितीन मिठारी, अक्षय हांडे, रणजित भोसले, गणेश पाटील, राहुल घाटगे, कुणाल भोसले, विनायक जाधव, संजय घाटगे, भोला पाटील, आदींचा सहभाग होता.