शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

न्यायव्यवस्था लोकाभिमुख करण्यास चालना

By admin | Updated: October 4, 2016 00:58 IST

देवानंद शिंदे : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे लोकअदालत मोबाईल व्हॅनचे उद्घाटन

कोल्हापूर : फिरत्या विधी सेवा तथा लोकअदालतमुळे समाजातील तंटे सामंजस्याने सुटण्यास मदत होणार असून, या उपक्रमाच्या माध्यमातून न्यायव्यवस्था अधिकाधिक लोकाभिमुख होण्यास चालना मिळेल, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी सोमवारी येथे केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात ‘फिरत्या विधी सेवा तथा लोकअदालत मोबाईल व्हॅन’च्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच वृक्ष पूजन करून फिरते विधी सेवा तथा लोकअदालत मोबाईल व्हॅनचे उद्घाटन करण्यात आले.डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, फिरत्या लोक न्यायालयासारख्या उपक्रमांच्या माध्यमातून न्यायव्यवस्था लोकाभिमुख होत आहे, हे अत्यंत स्तुत्य म्हणावे लागेल. भारतीय न्यायव्यवस्था ही बुद्धी व विवेक यांचा जाणीवपूर्वक वापर करणारी जगातील एकमेव न्यायव्यवस्था आहे.डॉ. अमित सैनी म्हणाले, जनतेला न्यायासाठी न्यायालयापर्यंत जावे लागते. यामध्ये वेळ, पैसा व श्रम यांचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. त्या अनुषंगाने समाजामध्ये तंटे उद्भवू नयेत, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, याकरिता महात्मा गांधी तंटामुक्तीसारखी मोहीम शासनाने हाती घेतली आहे. या पार्श्वभूमीवर फिरते विधी सेवा तथा लोकअदालतसारखा उपक्रम जिल्ह्यात सुरू होत आहे, हे स्तुत्य म्हणावे लागेल.प्रदीप देशपांडे म्हणाले, फिरत्या विधी सेवा तथा लोकअदालतमुळे या चक्रव्यूहापासून सामान्य व्यक्ती दूर राहण्यास मदत होणार आहे. समाजातील बहुतांश तंटे सामंजस्य व तडजोडीतून सुटण्यास मदत झाली तर कायदा व सुव्यवस्थेबरोबरच पोलिस खात्यावरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. जिल्हा न्यायाधीश एस. पी. कुलकर्णी यांनी, लोकअदालत ही संकल्पना समाजामध्ये हळूहळू रुजत असल्याचे सांगितले.याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, जिल्हा न्यायाधीश एस. पी. कुलकर्णी, निवृत्त जिल्हा न्यायाधीश जी. एम. टंकसाळी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. उमेशचंद्र मोरे, शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मानसिंग बोंदे्र, संस्थेचे उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील-भुयेकर, उपवन संरक्षक प्रभुनाथ शुक्ला, आदी उपस्थित होते. यावेळी उमेशचंद्र मोरे यांनी प्रास्ताविक, तर श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एच. एस. व्हनमोरे यांनी स्वागत केले. प्रा. पंढरीनाथ पाटील यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी पक्षकार, विद्यार्थी, सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, अधिकारी व नागरिक उपस्थित होते. प्रा. डॉ. पांडुरंग पाटील यांनी आभार मानले.कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे सोमवारी श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात ‘फिरत्या विधी सेवा तथा लोकअदालत मोबाईल व्हॅन’चे उद्घाटन झाले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, जिल्हा न्यायाधीश एस. पी. कुलकर्णी, निवृत्त जिल्हा न्यायाधीश जी. एम. टंकसाळी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. उमेशचंद्र मोरे, आदी उपस्थित होते.