शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

न्यायाधीश, कर्मचाऱ्यांना कामकाजास अटकाव करणार

By admin | Updated: January 31, 2015 00:02 IST

वकिलांच्या बैठकीत निर्णय : सर्किट बेंचसाठी आज आंदोलन

कोल्हापूर : कोल्हापुरात सर्किट बेंच व्हावे या मागणीसाठी उद्या, शनिवारी कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील न्यायाधीश व न्यायालयीन कर्मचाऱ्यांना ज्या-त्या जिल्ह्यात न्यायालयीन कामकाजापासून अटकाव करण्याचा निर्णय आज, शुक्रवारी जिल्हा वकील बार असोसिएशनच्या बैठकीत वकिलांनी घेतला. टाऊन हॉल येथील बार असोसिएशनच्या सभागृहात दुपारी खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक अ‍ॅड. विवेक घाटगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांची ६ फेब्रुवारीला होणाऱ्या बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांना भेटून आपली बाजू मांडण्याचा निर्णय यावेळी घेतला.सर्किट बेंच व्हावे यासाठी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांच्या दालनात काल, गुरुवारी झालेली बैठक निष्फळ ठरल्यानंतर उद्या, शनिवारी न्यायाधीश व कर्मचाऱ्यांना सहा जिल्ह्यांतील ज्या त्या क्षेत्रातील न्यायालयीन कामकाजापासून वकील बांधव अटकाव करणार आहेत. त्यासाठी टाऊन हॉल येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात सकाळी साडेनऊ वाजता वकील बांधवांनी तसेच पक्षकारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन बैठकीत बार असोसिएशनने केले. या बैठकीस उपाध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब पाटील, सेक्रेटरी अ‍ॅड. राजेंद्र मंडलिक यांच्यासह वकील उपस्थित होते.दरम्यान, मुंबईत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे फेबु्रवारीच्या दुसऱ्या आठवड्यात एका कार्यक्रमासाठी येणार आहेत. त्यावेळी मुखर्जी यांना भेटून कोल्हापुरात सर्किट बेंच व्हावे, अशी मागणी करूया, असे वकिलांनी यावेळी ठरविले.