शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जोतिबाची आज यात्रा; भाविक दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 00:19 IST

जोतिबा : दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची चैत्र पौर्णिमा यात्रा आज, शुक्रवारी होत आहे. यात्रेचा आज मुख्य दिवस असून, ...

जोतिबा : दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची चैत्र पौर्णिमा यात्रा आज, शुक्रवारी होत आहे. यात्रेचा आज मुख्य दिवस असून, जोतिबा डोंगरावर गुरुवारी रात्रीपर्यंत दोन लाख भाविक दाखल झाले आहेत.चैत्र यात्रेचे मुख आकर्षण असणाऱ्या सासनकाठी मिरवणुकीसाठी मानाच्या सासन काठ्या जोतिबा डोंगरावर दाखल झाल्या आहेत. ‘चांगभलं’च्या गजराने अवघा जोतिबाचा डोंगर दुमदुमून गेला आहे. डोंगर वाटा भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्या आहेत. बैलगाडी, खासगी वाहनांतून, चालत भाविक जोतिबा डोंगरावर आले आहेत. जोतिबा मंदिरात पहाटे तीनपासून धार्मिक विधी सोहळ्यास प्रारंभ होईल. पाच वाजता महाभिषेक, महापूजा होईल. १० वाजता धुपारती सोहळा होईल. जोतिबा डोंगरावरील सासनकाठ्यांची मिरवणूक मुख्य आकर्षण असते.चैत्र यात्रेत गुलाल-खोबरे, बंदी नाणी यांची पालखीवर होणारी उधळण अनोखी असते. सासनकाठ्या चाळीस फूट उंचीच्या असतात. रंगीबेरंगी कपड्यांनी सजविलेल्या सासनकाठ्या आकर्षक व सुंदर दिसतात. काही काठ्यांना नोटांच्या माळा, फुलांच्या माळा असतात. हलगी, पिपाणी, तुतारी, सनईच्या तालावर काठ्या विशिष्ट पद्धतीने नाचविल्या जातात.दुपारी १२ वाजता सासनकाठीच्या मिरवणुकीस प्रारंभ होईल. त्यावेळेस देवस्थान कमिटीचे म्हालदार, चोपदार तोफेच्या सलामीने मिरवणुकीस प्रारंभ होईल. या मिरवणुकीमध्ये क्रमाने पहिला मान इनाम पाडळी (जि. सातारा) या सासनकाठीचा, त्यानंतर मौजे विहे (ता. पाटण), करवीर कोल्हापूरची हिंमत बहादूर चव्हाण, कोल्हापूर छत्रपती, कसबा डिग्रज (ता. मिरज), कसबा सांगाव (ता. कागल), किवळ (जि. सातारा), कवठेएकंद (जि. सांगली) यांच्या मानाच्या १८ सासनकाठ्या सहभागी होतील. मान नसलेल्या ५७ आणि इतर २९ अशा एकूण ९६ सासनकाठ्या सहभागी असतात. हस्त नक्षत्रावर दुपारी बारा वाजता सासनकाठ्यांच्या मिरवणुकीस प्रारंभ होईल. यावेळी तोफेच्या सलामीने जोतिबा मंदिरातून यमाई मंदिराकडे पालखी मार्गस्थ होईल. सायंकाळी साडेसहा वाजता यमाई मंदिरात यमाईदेवी व जमदग्नी यांच्या विवाह सोहळ्याचा धार्मिक विधी होईल.यात्रेवर निवडणुकीचा परिणामयंदा लोकसभा निवडणुकीचा परिणाम यात्रेच्या गर्दीवर जाणवत आहे. गुरुवारी दुसºया टप्प्यातील मतदान असल्याने गतवर्षीपेक्षा भाविकांची गर्दी यंदा कमी पाहायला मिळाली. मतदान करून येणाºया भाविकांमुळे गुरुवारी रात्रीपासून गर्दी वाढली जाणार आहे.