शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

जोतिबा यात्रेसाठी पाच मिनिटाला एस.टी.

By admin | Updated: March 26, 2015 00:07 IST

भाविकांची सोय : कोल्हापूर विभागाचे १६५ गाड्यांचे नियोजन

कोल्हापूर : ‘दख्खनचा राजा’ जोतिबाच्या यात्रेनिमित्त कोल्हापूर शहरातून पाच मिनिटाला एस. टी. बसची सोय यात्रेच्या काळात राज्य परिवहन मंडळाच्या कोल्हापूर विभागाने केली आहे. जोतिबा यात्रेसाठी भाविकांच्या सोयीसाठी यंदा १६५ बसगाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. जोतिबा डोंगर (वाडी रत्नागिरी) येथे चैत्र पौर्णिमेनिमित्त होणाऱ्या यात्रेत भाविकांच्या सोयीसाठी शहरातून दि. १ ते ५ एप्रिलपासून दर पाच मिनिटाला बसची सोय केली आहे. यासह पुणे, सातारा, सोलापूर या विभागांकडून थेट जोतिबा डोंगर येथे जाणाऱ्या व येणाऱ्या भाविकांसाठी गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. गतवर्षी यात्रेसाठी १५० गाड्यांची सोय करण्यात आली होती. यंदा त्यात वाढ करून १६५ गाड्यांची सोय करण्यात आली आहे.गिरोलीहून पुढे मुख्य यात्रेच्या दिवशी दुचाकीला डोंगरावर प्रवेश दिला जाणार नाही, त्यामुळे तिथून पुढे भाविकांना एस. टी. महामंडळ किंवा केएमटीचा आधार घ्यावा लागणार आहे. भाविकांनी वैयक्तिक वाहनांचा वापर टाळून एसटीच्या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)शहरातील व्यवस्था मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्टेशन, टाऊन हॉल, पंचगंगा घाट या चार ठिकाणी भाविकांसाठी दर पाच मिनिटाला बससेवा सुरू करण्यात आली आहे, तसेच १ ते २६ एप्रिलपर्यंत पंचगंगा घाट येथे भाविकांच्या सोयीसाठी तात्पुरत्या स्वरुपाचे शेड मारून या ठिकाणाहून जोतिबा डोंगरावर जाण्यासाठी महामंडळाने सोय केली आहे. भाविकांची वाहतुकीच्या दृष्टीने कोणतीही गैरसोय होणार नाही. याची आम्ही काळजी घेणार आहोत. यंदा वाढविलेल्या गाड्यांच्यामार्फत ३ हजार फेऱ्या केल्या जाणार आहेत. यासाठी २४ तास एसटी या मार्गावर धावणार आहेत. तसेच यात्रेसाठी जोतिबा डोंगर व पंचगंगा घाट या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाचे निवारे उभारण्यात आले आहेत. पी. व्ही. पाऊसकर, विभागीय वाहतूक अधिकारी