शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

‘चांगभलं’च्या गजरात जोतिबा खेटे यात्रेची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2017 00:46 IST

दोन लाख भाविक : पहाटेपासून मंदिरात दर्शनासाठी गर्दी; गुलाल, खोबऱ्याची मोठ्या प्रमाणात उधळण

जोतिबा : दोन लाख भाविकांच्या उपस्थितीत जोतिबा खेटे यात्रेची सांगता झाली. होळी पोर्णिमा, पाचवा खेटा, सलग सुटीच्या पर्वणीमुळे भाविकांची जोतिबा दर्शनासाठी अलोट गर्दी झाली. पेठवडगाव यादव प्रतिष्ठानच्यावतीने महाप्रसाद वाटप करण्यात आला.जोतिबा डोंगरावर ‘चांगभलंऽऽ’च्या गजरात रविवार खेटे यात्रेची सांगता झाली. पाचव्या खेटेला भाविकांनी पहाटेपासूनच जोतिबा दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली. पाद्यपूजा, काकड आरती, अभिषेक विधी सकाळी संपन्न झाला. कोल्हापूर ते जोतिबा पायी प्रवास करीत आलेल्या भाविकांना मंदिरात अल्पोपहार वाटप करण्यात आला. सकाळी ११ वा. जोतिबाचा धुपारती सोहळा निघाला. गुलाल खोबरे उधळून ‘चांगभलंऽऽ’च्या गजरात धुपारतीचे भाविकांनी दर्शन घेतले. यावेळी उंट, घोडे, वाजंत्री, देवसेवक या लवाजम्यासह देवस्थान समितीचे प्रभारी लक्ष्मण डबाणे, सिंधिया देवस्थानचे प्रभारी आर. टी. कदम, धुपारती सोहळ्यात सहभागी झाले होते. जोतिबा मंदिराभोवती चार पदरीची दर्शन रांग दुपारनंतर मिटके आणि ठाकरे गल्लीपर्यंत पोहोचली होती. कोडोली पोलिस ठाण्याचे स.पो.नि. विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात होता. जोतिबा मंदिरात पेठवडगावच्या यादव प्रतिष्ठानच्यावतीने महाप्रसाद वाटप करण्यात आला. हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. पाच खेटे पूर्ण करणाऱ्या भाविकांनी जोतिबा देवास अभिषेक, पोषाख, पुरण-पोळीचा नैवेद्य करून खेटेची सांगता केली.जोतिबा मंदिर परिसरात भजनाचा कार्यक्रम झाला. रात्री ८ वाजता श्री जोतिबा देवाचा पालखी सोहळा निघाला. ‘चांगभलंऽऽ’च्या गजरात भाविकांनी जोतिबा उत्सव मूर्तीचे दर्शन घेतले. होळी पौर्णिमानिमित्त होळी पूजनाचा विधी झाला. रात्री अकरापर्यंत भाविक दर्शनासाठी येत होते. (वार्ताहर)पाचवा खेटा, होळी पौर्णिमा आणि सलग सुटीच्या पर्वणीमुळे जोतिबा दर्शनासाठी भाविकांची झालेली अलोट गर्दी झाली होती. दुसऱ्या छायाचित्रात जोतिबा देवाची खडी अलंकारिक महापूजा बांधण्यात आलेली होती.