शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर विमानतळप्रश्नी लवकरच एकत्रित बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळ प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी लवकरच बैठक घेण्याची तयारी नूतन केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळ प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी लवकरच बैठक घेण्याची तयारी नूतन केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी शनिवारी दर्शविली. खासदार संभाजीराजे यांनी त्यांंची दिल्लीत जाऊन भेट घेतली व मंत्री झाल्याबद्दल त्यांचा सत्कार केला.

कोल्हापूर विमानतळावर नाइट लँडिंगची सुविधा सुरू करण्यात येणारे अडथळे जलद दूर करावेत, अशी मागणी संभाजीराजे यांनी केली. लवकरच डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन, भारतीय विमानतळ प्राधिकरण, कोल्हापूर विमानतळ प्रशासन, कोल्हापूरचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी व संबंधित विभागांचे प्रमुख यांच्यासोबत बैठक घेण्याची मागणी केली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच अशी बैठक घेऊन सर्व विषय मार्गी लावू, असे आश्वासन मंत्रिमहोदयांनी दिले. कोल्हापूर विमानतळाचे ‘छत्रपती राजाराम महाराज विमानतळ’ असे नामकरण करण्याबाबतचा ठराव महाराष्ट्र सरकारने पुन्हा करून दिल्यास केंद्र शासन असे नामकरण करील, असेही मंत्री शिंदे यांनी स्पष्ट केलेे.

करवीर छत्रपती घराण्याशी ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचे पूर्वीपासून मैत्रीपूर्ण संबंध आहेत. राजर्षी शाहू छत्रपती महाराज व ग्वाल्हेरचे महाराज श्रीमंत माधवराव शिंदे हे अत्यंत जवळचे मित्र होते. आजही छत्रपती घराण्याशी ग्वाल्हेरकर शिंदे घराण्याचे मैत्रीपूर्ण संबंध टिकून आहेत. छत्रपती राजाराम महाराजांनी सुरू केलेल्या कोल्हापूर विमानतळास महाराजांचे नाव देण्याची मागणी संभाजीराजे यांनी यावेळी केली. महाराष्ट्र शासनाने २०१८ ला तसा ठराव करून प्रस्ताव दिला होता. मात्र, तसाच ठराव पुन्हा एकदा करून पाठविल्यास विमानतळास छत्रपती राजाराम महाराजांचे नाव देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली.

३१०७२०२१-कोल-संभाजीराजे भेट

केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची शनिवारी खासदार संभाजीराजे यांनी दिल्लीत जाऊन भेट घेतली व मंत्री झाल्याबद्दल त्यांचा सत्कार केला.