शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

सतेज पाटील यांना साथ द्या; शहराचा आणखी विकास करू

By admin | Updated: October 28, 2015 00:42 IST

प्रणिती शिंदे यांचे आवाहन : राजलक्ष्मीनगरात प्रचारसभा

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेसाठी तब्बल १२०० कोटी रुपये आणून शहराबरोबर जिल्ह्याचा विकास केला; पण येथील मतदारांनी विधानसभेला कुणाच्या तरी भूलथापांना बळी पडून चुकीचा निर्णय घेतला. काँग्रेस म्हणजे माजी गृहराज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील हेच समजून या निवडणुकीत त्यांना साथ द्या, आणखी विकास करू, असे आवाहन सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवारी येथे केले. राजलक्ष्मीनगर प्रभागातील काँग्रेस उमेदवार दीपा दिलीप मगदूम यांच्या प्रचारार्थ देवकर पाणंद निकम पार्क येथील सभेत त्या बोलत होत्या.जनतेला ‘अच्छे दिन’चे गाजर दाखवून व भूलभुलैया करून सत्तेवर पोहोचलेले पंतप्रधान मोदी म्हणजे जादूगार आहेत, अशी टीका शिंदे यांनी केली. यावेळी व्यासपीठावर प्रतिमा सतेज पाटील, उमेदवार दीपा मगदूम, सुरेश कुराडे, संध्या घोटणे, युवराज गवळी, माजी सभापती दिलीप टिपुगडे, प्रा. निवास पाटील, दिग्विजय मगदूम उपस्थित होते.प्रणिती शिंदे म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने ‘अच्छे दिना’चे गाजर दाखविले. पण, प्रत्यक्षात आज महाराष्ट्रात शेतकरी दुष्काळाने होरपळत आहे. दुसरीकडे, काँग्रेस सरकारने जनतेच्या हितासाठी सुरू केलेल्या योजना बंद करून जनतेला उपाशी ठेवण्याचे काम हे सरकार करीत आहे. परदेश दौऱ्यांवर जाण्यासाठी मोदी सरकारकडे पैसे आहेत; पण, शेतकरी व सरकारी योजनांचे पैसे त्यांना देता येत नाहीत. विरोधकांचा आवाज बंद करण्याचे भाजपचे काम सुरू आहे.प्रतिमा पाटील यांनी, कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात सतेज पाटील यांनी ६० टक्के विकास केला. मात्र, आज ‘खोबरं तिकडं चांगभलं’ ही प्रवृत्ती वाढत आहे. त्यामुळे अशा प्रवृत्तींना त्यांची जागा दाखवा, असे सांगत विधानसभेत जी चूक झाली ती आता करू नका. काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना निवडून आणावे, असे आवाहन केले. यावेळी संतोष कांदेकर, युवराज गवळी यांचे भाषण झाले. सुयोग मगदूम यांनी आभार मानले. ( प्रतिनिधी )+++++गुटखाबंदी केली म्हणून...माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी गुटखाबंदी केली म्हणून काहीजण नाराज झाले; पण, पाटील यांनी तरुणाईकडे बघून घेतलेला हा सकारात्मक निर्णय होता; परंतु विरोधकांनी याचा अपप्रचार करून व काहींनी पैसे देऊन त्यांचा विधानसभेत पराभव केला. गेली १७ वर्षे काँग्रेसचे आमदार आहेत. स्वार्थी, पक्षांचे काही देणे-घेणे नाही, अशांना या निवडणुकीत त्यांची जागा दाखवा, अशी टीका आमदार महादेवराव महाडिक यांचे नाव न घेता प्रतिमा पाटील यांनी केली.