शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
6
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
7
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
8
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
9
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
10
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
11
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
12
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
13
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
14
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
15
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
16
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
17
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
18
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
19
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
20
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती

परिवर्तनाच्या लढाईत सामील व्हा

By admin | Updated: January 12, 2015 00:37 IST

पन्नालाल सुराणा : 'भविष्यातील राष्ट्रसेवादल व परिवर्तनाची लढाई' विषयावर परिसंवाद

कोल्हापूर : दुबळ्यांचे आर्थिक बळ वाढत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने परिवर्तन होणार नाही. त्यामुळे या लढाईत प्रत्येकाने सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रसेवा दलाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ विचारवंत पन्नालाल सुराणा यांनी आज, शनिवारी येथे केले.भरत लाटकर गौरव समारंभानिमित्त मार्केट यार्डमधील मुस्कान लॉन येथे 'भविष्यातील राष्ट्रसेवादल व परिवर्तनाची लढाई' या विषयावरील परिसंवादात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रसेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त डॉ. अभिजित वैद्य होते.पन्नालाल सुराणा यांच्या हस्ते राष्ट्रसेवा दलाचा ध्वज लावून परिसंवादाचे उद्घाटन झाले. यावेळी मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे कार्याध्यक्ष शमशुद्दीन तांबोळी, माजी आमदार श्रीपतराव शिंदे, बाबासाहेब नदाफ, भरत लाटकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.सुराणा म्हणाले, परिवर्तन सत्तेच्या मार्गाने ज्यांना करायचे आहे त्यांना करू देत, परंतु आपण सेवादलाच्या माध्यमातून शिस्तीच्या चौकटीत राहून ते करायचे आहे. आपला हा विचार बहुजन समाजासाठी आहे. दलित व वंचितांना समाजात बरोबरीने स्थान मिळवून देण्याची जबाबदारी राष्ट्रसेवा दलावर आहे. भांडवलशाहीचे विदारक परिणाम सर्वांना भोगावे लागत आहेत. या विरोधात सर्वच राष्ट्रात चळवळ सुरू आहे. संपत्तीचे केंद्रीकरण व भांडवलदारांचा मदमस्तपणा या विरोधात सेवादलाला स्पष्ट भूमिका घ्यावी लागणार आहे. त्याचा तर्कशास्त्र पद्धतीने अभ्यास करावा लागणार आहे. ते पुढे म्हणाले, सामाजिक विषमतेला सुरूंग लावायचा असल्यास दलितांना व वंचितांना आर्थिक सक्षम बनविले पाहिजे. यासाठी संघटना बांधण्याचे काम हाती घेतले पाहिजे. दलाच्या पाईकांनी कंबर कसून याद्वारे घराघरांत जाऊन प्रत्येकाला या परिवर्तनाच्या लढाईत सहभागी करून घेतले पाहिजे.तांबोळी म्हणाले, हिंदुत्ववादी व ‘एमआयएम’ यांंच्यासारख्या सडलेल्या मेंदूतून येणाऱ्या भाषेमुळे सामाजिक अशांतता माजत आहे. अलीकडच्या काळात अशा घटना अनेक घडत असून त्याची यादी वाढत आहे. तीनवेळा बंदी घातलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ताब्यातच आता देशाची सत्ता आली आहे. अलीकडच्या पिढीत अराजक व धर्मांधपणा आला आहे. तो उखडून टाकण्यासाठी सामाजिक परिवर्तनाची गरज आहे. डॉ. वैद्य म्हणाले, देशात सध्या भगव्या करमणुकीचा कार्यक्रम सुरू आहे. कॉमेडियन कपिल शर्माच्या ‘कॉमेडी शो’प्रमाणे दररोज मोदी सरकारमधील मंत्र्यांकडून विनोद केले जात आहेत. भगवत्गीतेला देशाचा राष्ट्रीय ग्रंथ करण्याची भाषा होऊ लागली आहे, परंतु ही क्षमता फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेमध्येच आहे. या घटनेची तुलना कुठल्याही धार्मिक ग्रंथाशी होऊ शकत नसल्याचे डॉ. वैद्य यांनी स्पष्ट केले.यावेळी शिवाजीराव परूळेकर, हुसेन जमादार, मनोहर नवनाळे, अशोक शेवडे यांच्यासह राष्ट्रसेवा दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाबासाहेब नदाफ यांनी प्रास्ताविक केले. शशिकांत मुद्दापुरे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)