शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘जोडी जन्मोजन्माची, कसम प्रेमाची’ उद्या रंगणार

By admin | Updated: March 9, 2016 00:49 IST

मनोरंजक स्पर्धा : कलर्स व लोकमत सखी मंचतर्फे आयोजन; पती-पत्नीसाठी प्रेमाच्या गोष्टीला प्रेमाचा पुरस्कार

कोल्हापूर : आतापर्यंत ‘कलर्स’ चॅनेल व लोकमत ‘सखी मंच’च्या प्रत्येक कार्यक्रमाला महिलांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. त्याच शृंखलेत पुन्हा एकदा पती-पत्नींच्या नात्यातील प्रेमाच्या बंधनांना स्पर्धांमधून सर्वांसमोर आणणारा ‘जोडी जन्मोजन्मांची, कसम प्रेमाची’ हा सुंदर कार्यक्रम नव्याने येत आहे. या अंतर्गत तीन स्पर्धा आणि विजेत्यांना विशेष पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून सखी मंच सभासद नसलेल्या पती-पत्नीही सहभाग घेऊ शकतात. स्पर्धक म्हणून सहभागी होण्यासाठी नोंदणी करण्याचा आज, बुधवार शेवटचा दिवस आहे. पहिली स्पर्धा - बेस्ट जोडी (गीत). अतूट गायक जोडी - यामध्ये पती-पत्नी यांनी मिळून गाणे सादर करावयाचे आहे. हे गाणे कोणत्याही चित्रपटातील पुनर्जन्मावर अथवा प्रेमावर गाणे असायला हवे. दुसरी स्पर्धा - बेस्ट जोडी (अभिनय). अतूट अभिनय जोडी - त्यातदेखील कोणत्याही पुनर्जन्मावर किंवा प्रेमावर आधारित कुठल्याही चित्रपटातील डायलॉग किंवा सीन पती-पत्नी यांनी मिळून सादर करावयाचा आहे. तिसरी स्पर्धा - बेस्ट जोडी (कविता) अतूट प्रेम जोडी - यात पुनर्जन्मावर अथवा प्रेमावर आधारित स्वरचित कविता दोघांनी मिळून सादर करावयाची आहे. प्रत्येक स्पर्धेत प्रथम नोंदणी करणाऱ्या दहा जोड्यांना प्रवेश दिला जाईल. या स्पर्धेच्या निमित्ताने पती-पत्नींसाठी अतिशय सुंदर विषय हाताळले जाणार असून, दोघांना आपल्या नात्याची परीक्षा या स्पर्धांमधून द्यायची आहे आणि पुरस्कारही जिंकायचा आहे. याव्यतिरिक्त उपस्थित प्रेक्षकांसाठी ‘बॉलिवूड जोडी’ ही मनोरंजक स्पर्धा आहे. त्यात चित्रपट जगतातील जोडी बनून यायचे आहे, तसा गेटअप करावयाचा आहे व वेशभूषा करायची आहे. त्यात पती-पत्नी असणे आवश्यक नाही. त्यात दोन सखी, बहीण-भाऊ किंवा पती-पत्नी असे भाग घेऊ शकतात. ‘बेस्ट बॉलिवूड जोडी’ म्हणून विजेत्यांना पुरस्कार दिले जातील. ‘कलर्स चॅनेल’ने नेहमीच अशा सुंदर विषयांवर मालिकांचे प्रसारण करून स्वतंत्र चाहतावर्ग निर्माण करून तो कायम राखण्याचे प्रयत्न केले आहेत. त्याच प्रयत्नांत आणखी एक निस्सीम प्रेमावर आधारित ‘कसम’ ही मालिका ७ मार्चपासून सोमवार ते शुक्रवार रोज रात्री १० वाजता प्रसारित होत आहे. एका मुलीचा आपल्या प्रेमावर इतका प्रचंड विश्वास असतो की, तो मिळविण्यासाठी दुसरा जन्म घेऊन त्या प्रेमाला मिळविण्यात ती यशस्वी होते. ‘कसम’ ही मालिका ऋषी आणि तनुश्री या दोन प्रेम करणाऱ्या तरुण-तरुणीवर आधारित असून, त्यांच्या प्रेमाच्या वाटेत प्रेम, विरह आणि प्रेम अशा प्रवासाची सुंदर मांडणी करून प्रेम हेच जगण्याची आणि जगविण्याची खरी ताकद आहे, असे सांगितले आहे. अशा प्रेमाच्या ‘कसम’ या मालिकेसोबत ही स्पर्धा आणि विजेत्या स्पर्धकांना विशेष पुरस्कार एकूणच ‘जोडी जन्मोजन्माची, कसम प्रेमाची’ हा ‘कलर्स’ व ‘लोकमत सखी मंच’चा कार्यक्रम प्रेमाच्या वेगळ्या जगात नेण्याची किमया करेल. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी लोकमत कार्यालयात येऊन नोंदणी फॉर्म भरणे आवश्यक आहे. कार्यक्रम गुरुवारी (दि. १०) दुपारी चार वाजता डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवन, राजारामपुरी येथे होणार असून, अधिक माहितीकरिता ९६२३८९५८६६ येथे संपर्क साधावा. (प्रतिनिधी)बक्षिसे जिंकण्याची अनोखी संधी..‘जोडी जन्मोजन्माची, कसम प्रेमाची’ कार्यक्रमात प्रेम या संकल्पनेवर आधारित नव्या-जुन्या हिंदी-मराठी गाण्यांवरील नृत्याविष्कार सादर होणार आहेत. त्याचबरोबर बक्षीस योजनेच्या माध्यमातून सखींना विविध बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. कार्यक्रमस्थळी सखी मंच सभासद नोंदणी केली जाईल.