शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

वीस रुपयांत ‘झुणका-भाकरी’

By admin | Updated: June 19, 2014 01:13 IST

शेतकरी सहकारी संघ सेवक संस्था : भवानी मंडपात भाविकांची गर्दी

राजाराम लोंढे ल्ल कोल्हापूरकरवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी येणारे भाविक व परगावांहून येणाऱ्यांसाठी अगदी माफक दरात झुणका-भाकरी मिळणार आहे. सामाजिक जाणिवेतून शेतकरी सहकारी संघ सेवक संस्थेच्यावतीने भवानी मंडपात हा उपक्रम सुरू केला असून, वीस रुपयांत पोटभर जेवण मिळत असल्याने भाविकांसह नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शेतकरी संघ म्हटले की, विश्वासाचे नातेच समोर येते. संपूर्ण आशिया खंडात नावाजलेल्या संघाचे नाते अजूनही सामान्य माणसांमध्ये घट्ट आहे. मध्यंतरीच्या काळात संघाची आर्थिक घडी थोडी विसकटली होती; पण संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नातून संघाची वाटचाल पूर्व वैभवाकडे सुरू आहे. शेतकरी संघाची वाटचाल ही सामाजिक बांधीलकीतून सुरू आहे. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत शेतकरी संघाच्या सेवक संस्थेने वाटचाल सुरू केली आहे. अंबाबाईच्या दर्शनासाठी रोज हजारो भाविक विविध ठिकाणांहून येतात. मंगळवार, रविवार, शुक्रवार या दिवशी तर भाविकांची संख्या वाढते. येथे सर्वसामान्य भाविकांची संख्याही लक्षणीय असते. अक्कलकोट, शिर्डी, आदी ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी मोफत अन्नछत्राची सोय केलेली आहे. येथेही मोफत अन्नछत्राची सोयआहे. अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना माफक दरात जेवण देण्याचा प्रयत्न शेतकरी संघ सेवक संस्थेने केला आहे. शेतकरी संघाच्या भवानी मंडप येथील संस्थेच्या कार्यालयात भाविकांसाठी ही सोय केलेली आहे. वीस रुपयांत दोन भाकरी, दोन वाटी झुणका, खर्डा, कांदा, पापड, आदी भाविकांसह इतरांनाही अशा प्रकारचे जेवण मिळणार आहे. आज आपण कोल्हापूर शहरात मिसळ खायची म्हटले, तर ३५-४० रुपये मोजावे लागतात. वडापाव पंधरा रुपयांना मिळतो. त्याच्या तुलनेत झुणका-भाकरी फारच स्वस्त आहे. या परिसरातच एक भाकरी, भाजी तीस रुपयांना मिळते. पण, येथे दोन भाकरी, भाजी, पापड, खर्डा अवघ्या वीस रुपयांत मिळत असल्याने भाविक व येथे येणाऱ्या नागरिकांची गर्दी होत आहे.