शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वारणानगर रोकड चोरी प्रकरणी झुुंजार सरनोबत यांच्यावरही खटले

By admin | Updated: May 11, 2017 18:26 IST

घनवटसह कांबळेच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. ११ : कोल्हापूर जिल्हयातील वारणानगर (ता. पन्हाळा) येथील शिक्षक कॉलनीतील चोरी प्रकरणी फिर्याद दाखल केलेले बांधकाम व्यावसायिक झुंजार सरनोबत यांच्यावर दिवाणी व फौजदारी स्वरुपाचे २० प्रलंबित व निकाली न्यायालयात खटले दाखल असल्याचा युक्तिवाद आरोपीचे वकील व सातारा येथील अ‍ॅड.आर.के.धायगुडे यांनी गुरुवारी केला.जिल्हा न्यायालयातील तदर्थ जिल्हा न्यायाधीश क्रमांक दोन एस.एम.कोचे यांच्या न्यायालयात सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निलंबित पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट व कॉन्स्टेबल कुलदीप कांबळे याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुमारे दोन तास अशंत: सुनावणी झाली. याची पुढील सुनावणी सोमवारी (दि. १५) होणार आहे.संशयित आरोपी घनवट व कांबळे यांच्यावतीने सातारा येथील अ‍ॅड. आर.के.धायगुडे यांनी युक्तिवाद केला. यावेळी जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. विवेक शुक्ल उपस्थित होते. वारणानगर येथील शिक्षक कॉलनीतील खोलीमधील चोरी प्रकरणी पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट, सहाय्यक निरीक्षक सूरज चंदनशिवे यांच्यासह सात जणांवर कोडोली पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी संशयित घनवट व कुलदीप कांबळे यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. यापुर्वी या प्रकरणातीलचार पोलिसांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. यावेळी अ‍ॅड. आर. के. धायगुडे यांनी, वारणानगर चोरीतील फिर्यादी झुंजार सरनोबत यांच्याविरोधातत दिवाणी व फौजदारी स्वरुपाचे सुमारे २० न्यायालयीन प्रकरणे (खटले) आहेत. त्यामुळे त्यांना कायद्याची चांगली जाण आहे. या शिक्षक कॉलनीत त्यांनी ठेवलेले पैसे हे सशंयास्पद आहे. या खोलीशेजारी एका संस्थेची रेकॉर्ड रुम आहे. त्यांचा हा केवळ दिखावा आहे. ते तपास यंत्रणेची दिशाभूल करीत आहेत. त्यांनी २०१६-१७ या आर्थिक वर्षाचा प्राप्तिकर ५० लाख रुपये प्राप्तिकर विभागाला भरणा केला आहे. त्यांनी जमीन खरेदीचा बनाव केला आहे. तसेच सुमारे १४ कोटी रुपयांच्या रक्कमेचा कोणताही पुरावा त्यांनी दिलेला नाही. प्राप्तिकर विभागाला त्यांनी ३ ते ४ कोटी रुपयांचा खुलासा केला आहे व तेवढ्याच रकमेचा आयकर भरला आहे. तसेच कोडोली पोलिसांनी केलेले चार्जशीट (दोषारोपपत्र) मध्ये जप्त केलेल्या रकमेचा व ही रक्कम कोठून आली याचा खुलासा नाही आहे. याचा तपास तत्कालीन शाहूवाडी पोलिस विभागाचे पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक विकास जाधव यांनी केला. सरनोबत यांचे नातेवाईक,नातेवाईकांचा मुलगा यांचा जबाब नोंदविला आहे. सुमारे चार कोटी ६४ लाख रुपये रक्कम जप्त केल्याचा उल्लेख दोषारोपपत्रात केला आहे.या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी मैनुद्दीन मुल्ला याचा मित्र विनायक जाधव याच्याकडून ६९ लाख रुपये घेऊन त्यातील ६८ लाख रुपये मैनुद्दीनने स्वत: जवळ ठेवून तो पसार झाला. ३१ मे २०१६ ला सरनोबत यांचा पुरवणी जबाब झाला. सरनोबत यांनी ही रक्कम परत मिळण्यासाठी पन्हाळा न्यायालयात अर्ज केला होता. तेव्हा संशयित आरोपी मैनुद्दीन मुल्ला याने ही रक्कम सरनोबत यांची नाही आहे. ही रक्कम मुंबई येथील गुन्ह्यातील आहे.त्याच्यावर मुंबईतील सात कोटी रुपयांचा आरोप आहे. तसेच मिरज बेथलहेमनगर येथे सापडलेली मैनुद्दीन मुल्लाच्या मेहूणीच्या घरात सापडलेली सुमारे तीन कोटी रुपयांची रक्कम ही चिकोडी येथील कॉलेज समोरुन लावलेल्या एका कारमधून त्याचा मित्र रेहान अन्सारी या दोघांनी चोरीस केली होती. यावरुन सरनोबत हे पोलिस , प्राप्तिकर विभाग यांची दिशाभूल करीत असल्याचा युक्तिवाद अ‍ॅड.आर.के.धायगुडे यांनी केला. धायगुडे यांना अ‍ॅड. अजित सावंत यांनी सहकार्य केले.