शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

जयसिंगपूरची पशु चिकित्सालय इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: June 19, 2015 00:18 IST

अडीच कोटी खर्च : कारभार अद्ययावत होणार

संदीप बावचे- जयसिंगपूर -शहरातील लघु पशु सर्व चिकित्सालय या तालुका रुग्णालयाच्या नव्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. शासनाच्या अडीच कोटी रुपयांच्या निधीतून सुसज्ज अशी इमारत उभारण्यात आली आहे. मात्र, फर्निचर या सामग्रीसाठी आणखीन निधीची गरज आहे. नवीन इमारतीप्रमाणेच कारभारदेखील तितकाच अद्ययावत असावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सांगली-कोल्हापूर महामार्गावर प्रथमवर्ग न्यायालयाच्या शेजारी शिरोळ तालुका लघु पशु सर्व चिकित्सालय रुग्णालयाची जुनी इमारत होती. सुरुवातीला जिल्हा परिषदेचा दवाखाना याठिकाणी कार्यरत होता. १९९५ मध्ये तालुका लघु पशु सर्व चिकित्सालय असे नामकरण झाले. ४२ गुंठे क्षेत्र असलेल्या जागेमध्ये आस्थापना विभाग, जनावरांसाठी तपासणी विभाग असे कामकाज येथून चालत होते. तालुक्यातील १६ पशुवैद्यकीय रुग्णालयांवर या कार्यालयाचे नियंत्रण असते.तीन वर्षांपूर्वी शासनाच्या जिल्हा नियोजन समितीअंतर्गत नवीन इमारत बांधकाम, शस्त्रक्रिया विभाग, अधिकारी, कर्मचारी यांच्या निवासस्थानासाठी अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. मात्र, या ४२ गुंठे जागेवर नगरपालिकेचे आरक्षण पडल्यामुळे निधी मंजूर असूनही बांधकाम करण्यास शासकीय अडचणी येत होत्या. न्यायालयीन लढाईनंतर या जागेवरील आरक्षण एप्रिल २०१३ मध्ये उठले. यामुळे नवीन इमारत बांधकामाचा मार्ग मोकळा झाला होता. या निधीअंतर्गत स्वतंत्र रुग्णालय यामध्ये बाह्यरुग्ण, आंंतररुग्ण, एक्सरे व शस्त्रक्रिया विभाग त्याचबरोबर अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधण्यात आली आहेत. (प्रतिनिधी)