शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जयसिंगपूर पालिकेचा आंधळा कारभार ! रस्ता हस्तांतरणाचा ठराव पालिकेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 23:43 IST

संदीप बावचे।जयसिंगपूर : शहरातून जाणारा कोल्हापूर-सांगली रस्ता नगरपालिकेकडे हस्तांतरणाच्या ठरावाला वर्षपूर्ती होत आली तरी हा रस्ता कागदावरच राहिला आहे. एकीकडे हस्तांतरणाचा ठराव तर दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रस्ता हस्तांतरणाबाबत कोणताही पत्रव्यवहार पालिकेने केलेला नाही. याबाबत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनीच दुजोरा दिला असून लोकप्रतिनिधींच्या या ठरावाला प्रशासनाने केराची टोपली दाखविल्याचाच प्रकार दिसून ...

संदीप बावचे।जयसिंगपूर : शहरातून जाणारा कोल्हापूर-सांगली रस्ता नगरपालिकेकडे हस्तांतरणाच्या ठरावाला वर्षपूर्ती होत आली तरी हा रस्ता कागदावरच राहिला आहे. एकीकडे हस्तांतरणाचा ठराव तर दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रस्ता हस्तांतरणाबाबत कोणताही पत्रव्यवहार पालिकेने केलेला नाही. याबाबत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनीच दुजोरा दिला असून लोकप्रतिनिधींच्या या ठरावाला प्रशासनाने केराची टोपली दाखविल्याचाच प्रकार दिसून येत आहे. त्यामुळे पालिकेतील बांधकाम विभागाचा आंधळा कारभार चव्हाट्यावर आला आहे.

सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शहरातील दारु दुकाने बंद झाली होती. शहरातून जाणारा सांगली-कोल्हापूर महामार्गावर बहुसंख्य दारु दुकाने होती. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत दारु दुकाने सुरु करण्यासाठी रस्ता हस्तांतरणाचा प्रश्न पुढे आला होता. हा रस्ता नगरपालिकेकडे हस्तांतरण करण्यात यावा, यासाठी लोकप्रतिनिधींना साकडे घालण्यात आले होते. मात्र, सामाजिक संघटनांनी रस्ता हस्तांतरणाला मोठा विरोध केला होता.

विरोधानंतर रस्ता हस्तांतरणाचा विषय बाजूला पडला.२८ आॅगस्ट २०१७ रोजी कोल्हापूर-सांगली रस्ता हस्तांतरणावरुन पालिकेची सभा झाली. या सभेत रस्ता नगरपालिकेकडे हस्तांतरणाचा विषय मंजूर झाला. रस्ता हस्तांतरणाचा विषय १५ विरुद्ध २ मतांनी मंजूर झाला होता. सभेस नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष व नगरसेवक असे आठजण अनुपस्थित होते. रस्ता हस्तांतरणाचा ठराव झाला असल ातरी सध्या या महामार्गावरील प्रलंबित कामाचे भिजत घोंगडे पडले आहे. अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधींनी कामाबाबत आवाज उठविण्याची गरज आहे.हस्तांतरणाला विरोधसार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या या महामार्गाचे चौपदरीकरणांतर्गत काम रखडलेले आहे. पालिकेला आर्थिक दृष्टिकोनातून भविष्यात या रस्त्याच्या देखभाल-दुरूस्तीचा खर्च पेलणारा नाही, याचाही विचार लोकप्रतिनिधींनी करावा, असा  सूर उमटला होता. महामार्गाच्या देखभाल दुरुस्तीचा बोजा जनतेवरच पडणार आहे. त्यामुळे हा रस्ता पालीकेकडे हस्तांतरण करू नये, अशी मागणी दोन नगरसेवकांनी केली होती.नेत्यांना प्रश्नांचा विसरकोल्हापूर-सांगली रस्ता हस्तांतरणाचा ठराव मंजूर झाल्यानंतर शहरातील विविध पक्ष, संघटनेच्या पदाधिकाºयांनी महामार्ग हस्तांतरणाला विरोध केला होता. ठराव रद्द न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा रस्ता हस्तांतरण विरोधी कृती समितीने दिला होता. मात्र, विरोध करणारे आणि आंदोलनाचा इशारा देणारे पक्ष व संघटनांच्या नेत्यांना या प्रश्नाचा विसर पडला असला तरी किमान वाहतुकीस धोकादायक ठरलेल्या या रस्त्याच्या पूर्णत्वासाठी त्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. 

जयसिंगपूर शहरातील उड्डाणपूल रद्द करावा, असा यापूर्वी पालिकेने ठराव दिलेला आहे. मात्र,जयसिंगपूर शहरातून जाणारा कोल्हापूर-सांगलीमहामार्ग हस्तांतरणाचा कोणताही ठरावनगरपालिकेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आलेला नाही.- व्ही. डी. शिंदे, बांधकाम उपअभियंता जयसिंगपूरशहरातून जाणारा महामार्ग रस्ता हस्तांतरणाचा ठराव झाला आहे. हा रस्ता डी-नोटिफाईड झाल्याशिवाय हस्तांतरीत होणार नाही. मात्र, ठरावाबाबतच्या पत्रव्यवहाराची माहिती घेऊ.- एन. एस. पवार, अभियंता,नगरपालिका बांधकाम विभाग