शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

जयसिंगपुरात नाट्यगृह होणार

By admin | Updated: October 1, 2015 23:37 IST

अंतिम टप्प्यातील निधीची प्रतीक्षा : जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर निविदा निघणार

संदीप बावचे --- जयसिंगपूर---शासनाच्या विविध योजनांमुळे नगरपालिका कार्यक्षेत्रात विकासकामांना प्राधान्य मिळाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या याच वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून सुमारे सहा कोटी ४० लाख रुपये खर्चाचे नाट्यगृह जयसिंगपूर येथे बांधण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात दोन कोटी ४८ लाख रुपये खर्चातून इमारत उभारण्यात आली आहे. अंतर्गत सजावटीसाठी दुसऱ्या टप्प्यांतील एक कोटी ४० लाख रुपयांची कामे पूर्णत्वास येत असून, तिसऱ्या टप्प्यांतील निधी उपलब्ध झाल्यानंतर अत्याधुनिक व अद्ययावत असे नाट्यगृह प्रेक्षकांसाठी खुले होणार आहे. शासनाच्या विविध योजनांमुळे नगरपालिकांना शहरात विकास साधण्यास मदत झाली आहे. वैशिष्ट्यपूर्ण योजना, नगरोत्थान योजना यांसह अन्य योजनांमधून कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाल्यामुळे जयसिंगपूर शहराच्या विकासात भर पडली आहे. शहराच्या वैभवात भर टाकणारा अशाच वैशिष्ट्यपूर्ण योजनेतील नाट्यगृहाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या अंतर्गत सजावटीचे काम सुरू असून स्व. शामराव पाटील-यड्रावकर नाट्यगृह म्हणून नावारूपास येणार आहे. दोन वर्षांपूर्वी या इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. दोन कोटी ५० लाख रुपये खर्चाचे हे काम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्प्यांतील एक कोटी ५० लाख रुपयांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सहा गुंठे क्षेत्रात हे नाट्यगृह बांधण्यात येत आहे. वातानुकूलित, अद्ययावत असणाऱ्या या नाट्यगृहाबरोबरच पार्किंग व्यवस्था, तळगृहात सभागृह, पार्किंग अशी सुसज्ज इमारत उभारण्यात येत आहे. याठिकाणी सात दुकान गाळे देखील उभारण्यात येणार आहेत. तिसऱ्या टप्प्यांतील एक कोटी निधीच्या निविदा प्रक्रियेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे, असे एकूण पाच कोटी रुपयांचा निधी नाट्यगृहासाठी खर्च केला जाणार आहे. एकूण निधीपैकी दहा टक्के निधी नगरपालिका खर्च करणार असून, उर्वरित ९० टक्के निधी शासनाकडून मिळाला आहे.