शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

जयसिंगराव शेंडगे शिवसेनेत

By admin | Updated: August 22, 2014 00:53 IST

राष्ट्रवादीला रामराम : उध्दव ठाकरेंच्या उपस्थितीत आज प्रवेश

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते जयसिंगराव शेंडगे यांनी राष्ट्रवादीला ‘जय महाराष्ट्र’ केला असून, उद्या (शुक्रवार) पाटण (जि. सातारा) येथे शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ते शिवबंधनात अडकणार आहेत. त्यांच्यासमवेत धनगर समाजाचे कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शेंडगे यांच्या शिवसेना प्रवेशाने राष्ट्रवादीला खिंडार पडले असून, गृहमंत्री आर. आर. पाटील यांना हादरा बसला आहे. येथे आज (गुरुवारी) शेंडगे यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती दिली. जयसिंगराव शेंडगे यांनी गेली पंचवीस वर्षे काँग्रेस व राष्ट्रवादीत काम केले आहे. १९८९ मध्ये काँग्रेसला पक्षातून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली. १९९९ मध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला, तर २००४ मध्ये बंडखोरी करून मिरज-कवठेमहांकाळ मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढविली होती. त्यांचा त्यावेळी १२ हजार मतांनी पराभव झाला होता. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेंडगे यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादीस खिंडार पडले आहे. ते गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यामुळे गृहमंत्री पाटील यांच्यासाठी हा हादरा मानला जात आहे. शेंडगे म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आघाडी सरकार राज्यातील धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी अपयशी ठरले आहे. हा प्रश्न शिवसेनेच्यावतीने उध्दव ठाकरे यांनी सोडविण्याचे मान्य केले आहे. त्यामुळेच आपण शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, कवठेमहांकाळ तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये उलट-सुलट चर्चा सुरु आहे. (वार्ताहर)