शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

जयप्रभाची जागा ताब्यात घेता येणार नाही- -लता मंगेशकर यांच्या वकिलांचा युक्तिवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 18:51 IST

जयप्रभा स्टुडिओ ही खासगी मालमत्ता असून त्यावर कोणत्याही प्रकारचे आरक्षण नाही त्यामुळे ही जागा शासनाला ताब्यात घेता येणार नाही असा युक्तिवाद शुक्रवारी ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांचे वकिल अ‍ॅड. महादेवराव आडगुळे यांनी केला

ठळक मुद्देही या प्रकरणाची अंतिम सुनावणी असणार आहे.

कोल्हापूर : जयप्रभा स्टुडिओ ही खासगी मालमत्ता असून त्यावर कोणत्याही प्रकारचे आरक्षण नाही त्यामुळे ही जागा शासनाला ताब्यात घेता येणार नाही असा युक्तिवाद शुक्रवारी ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांचे वकिल अ‍ॅड. महादेवराव आडगुळे यांनी केला. यावर मंगळवारी (दि.९) पुढील सुनावणी होणार आहे.

ज्या स्टुडिओत चित्रपटनिर्मिती करून भालजी पेंढारकर यांनी चित्रपटसृष्टीला सुवर्णकाळ दिला तो बेलबाग येथील जयप्रभा स्टुडिओ पाडून ही जागा बिल्डरला देण्याच्या निर्णयामुळे २०१४ साली कोल्हापुरात लता मंगेशकर यांच्या विरोधात मोठे जनआंदोलन उभारले होते. त्यावेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने हा स्टुडिओ शासनाने ताब्यात घेवून त्याचा विकास करावा अशी याचिका दाखल केली होती. या प्रकरणाची अंतिम सुनावणी सध्या कोल्हापुरातील न्यायालयात सुरू आहे.

शुक्रवारी झालेल्या सुनावणीत लता मंगेशकर यांच्यावतीने अ‍ॅड. महादेवराव आडगुळे यांनी बाजू मांडली. जयप्रभा स्टुडिओ ही खासगी मालमत्ता आहे. या जागेचा वापर केवळ चित्रपटसृष्टीसाठी व्हावा ही अट १९८२ सालीच काढूच टाकण्यात आली आहे. या जागेवर बागबगीचा व सांस्कृ तिक केंद्राचे २००६ साली टाकण्यात आलेले आरक्षणही २००८ मध्ये उठवण्यात आले आहे. त्यामुळे या जागेवर अन्य कोणत्याही व्यक्ती संस्था किंवा शासनाला आपला हक्क सांगता येणार नाही. तसेच अशा प्रकारची याचिका दाखल करण्यात अधिकार चित्रपट महामंडळाला नाही असा युक्तिवाद त्यांनी केला. सुमारे दीड तास त्यांनी म्हणणे मांडले. या विषयावर आता मंगळवारी (दि. ९) चित्रपट महामंडळाच्यावतीने अ‍ॅड. प्रकाश मोरे हे युक्तिवाद मांडणार आहेत. ही या प्रकरणाची अंतिम सुनावणी असणार आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCourtन्यायालय