शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

‘जातपडताळणी’चा लिपिक जाळ्यात

By admin | Updated: December 12, 2014 23:37 IST

संशयित परभणीचा : ३५ बनावट वैधता प्रमाणपत्रे दिली; दोन अधिकाऱ्यांवर संशय

कोल्हापूर : कोल्हापुरातील विभागीय जातपडताळणी समिती क्रमांक दोन या कार्यालयामधील कनिष्ठ लिपिक संशयित अनिल हरीराव ढवळे ( वय ३९, सध्या राहणार भगवा चौक, कसबा बावडा, मूळ रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर, आयटीआय रोड, परभणी) याला आज, शुक्रवारी शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. ढवळेने ३५ बनावट वैधता प्रमाणपत्र दिली असल्याची माहिती पुढे येत असून, यामध्ये दोन अधिकाऱ्यांकडे संशयाची सुई जात आहे. गत आठवड्यात या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी सांगली जिल्ह्यातील संशयित बाळासाहेब ऊर्फ प्रशांत महादेव हारगे (३२, रा. सलगरे, ता. मिरज) व मुख्य सूत्रधार समीर बाबासो जमादार (२९, रा. मल्लेवाडी , ता. मिरज) यांना पकडले आहे. या प्रकरणात पोलिसांनी तपास केल्यानंतर कोल्हापुरातील विभागीय जातपडताळणी समिती क्रमांक दोन या कार्यालयामधील कनिष्ठ लिपिक संशयित अनिल ढवळे याचे या प्रकरणात नाव पुढे आले. त्याची खात्री केल्यानंतर त्याला आज पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयीन कोठडी दिली.बनावट प्रमाणपत्र बनविणारी साखळीचसंशयित अनिल ढवळे हा २००८ पासून विभागीय जातपडताळणी समिती क्रमांक दोन या कार्यालयात कनिष्ठ लिपिक म्हणून काम करतो. त्याच्याकडे आलेल्या अर्जांची छाननी करून त्यामधील त्रुटी काढण्याचे काम तो करीत होता. त्रुटी काढून हा प्रकार तो संशयित हारगेला सांगत असे. हारगे हा संबंधित अर्जदाराला भेटून तुम्हाला जात वैधता प्रमाणपत्र देतो, असे सांगून पैसे घेत होता. त्यासाठी तो मुख्य सूत्रधार समीर जमादार याच्याकडून हे जातीचे बनावट वैधता प्रमाणपत्र करून घेत असे, अशी माहिती पोलीस तपासात पुढे येत आहे.