शहरं
Join us  
Trending Stories
1
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
2
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
3
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
4
काळजी घ्या! मार्केटमध्ये नवीन स्कॅम आला, व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका पाठवून बँक खाते रिकामे करतात
5
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न
7
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार
8
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
9
मैत्रिणीसोबत थांबला होता फ्लॅटमध्ये, तरुणाने अचानक ३२व्या मजल्यावरून मारली उडी
10
IB Recruitment: गुप्तचर विभागात ज्युनियर ऑफिसर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता
11
"तुम मराठी लोग भंगार हो..." नाशिकमध्ये परप्रांतीयानं दाखवला माज; नेमकं काय घडली घटना?
12
सरप्राइज मिळालं अन् मनातली ती भीती दूर झाली! वादळी शतकी खेळीनंतर रिंकू सिंहनं शेअर केली खास गोष्ट
13
"ट्रम्प असे आहेत जे सकाळी मोदींशी हात मिळवतील, रात्री पाठीत खंजीर खुपसतील," कोणी केली इतकी मोठी टीका?
14
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
15
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
16
Pune Dog Attack Video: एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण?
17
आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न
18
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
19
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला 'या' पाच चुका प्रत्येक गणेश भक्ताने टाळल्याच पाहिजेत!
20
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण

मोर्चासाठी रणरागिणींचा रॅलीने जागर

By admin | Updated: October 14, 2016 01:21 IST

मराठा मोर्चाला यायचंय : हजारो दुचाकींसह सहभाग; शहराचे लक्ष वेधले; पथनाट्यातून मांडली आरक्षणाची भूमिका

कोल्हापूर : महाविद्यालयीन तरुणींपासून सर्व वयोगटांतील महिलांचा सहभाग असलेल्या शिस्तबद्ध मोटारसायकल रॅलीने कोल्हापूरवासीयांचे लक्ष वेधले. निमित्त होते मराठा मूक मोर्चाच्या जनजागृतीचे. सकल मराठा महिलांच्यावतीने गुरुवारी सकाळी ताराराणी चौक येथून शहराच्या प्रमुख मार्गांवरून दुचाकी रॅली काढण्यात आली. या रॅलीत जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यांतून हजारो महिला, तरुणी सहभागी झाल्या होत्या. उद्या, शुक्रवारी कोल्हापुरातून निघणाऱ्या मोर्चात सर्व जातिधर्माच्या महिलांनी सहभागी व्हावे याकरिता शहराच्या प्रमुख मार्गांवरून रॅली काढण्यात आली. त्याची सुरुवात सकाळी ताराराणी चौक येथून झाली. यावेळी महापौर अश्विनी रामाणे यांच्या हस्ते छत्रपती ताराराणी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. या रॅलीचा मार्ग दाभोळकर कॉर्नर, व्हीनस कॉर्नर, दसरा चौक, आईसाहेब महाराज चौक, बिंदू चौक, शिवाजी चौक, भाऊसिंगजी रोड, सीपीआरमार्गे दसरा चौक असा होता. दरम्यान, छत्रपती राजाराम महाराज, शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास शरीयानी चौगुले व सिद्धी शिरगट्टी या बालिकांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. दसरा चौक येथे रॅली विसर्जित झाली. शहाजी कॉलेजच्या तरुण-तरुणींनी पथनाट्याच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण का हवे आहे, याचे दर्शन घडविले. अत्यंत शिस्तबद्धरीत्या काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येने महिला व तरुणी सहभागी झाल्या होत्या. मोर्चाच्या अग्रभागी संयोगीताराजे छत्रपती या जीपमधून, तर महापौर अश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला, मधुरिमाराजे छत्रपती, अरुंधती महाडिक, प्रतिमा पाटील, वैशाली क्षीरसागर, माजी महापौर सई खराडे, मनीषा जाधव, स्नेहल पवार, वैष्णवीराजे दाभाडे, अरुणा घोरपडे, सरिता राजेभोसले, वृषाली कदम, आदी मान्यवर सकल मराठा महिला रॅलीमध्ये दुचाकीवर स्वार होऊन सहभागी झाल्या होत्या. विशेष म्हणजे या रॅलीत काही तरुणींनी बुलेटही आणल्या होत्या. या रॅलीने शहरातील एकूणच वातावरण मराठा मोर्चामय झाले होते.यांचा सहभागसिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूल, शाहू विद्यालय, तारा कमांडो फोर्स, मोहामेडन एज्युकेशन सोसायटीचे नेहरू विद्यालयाच्या विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. यासह अ‍ॅड. वृषाली देसाई, नीलांबरी गिरी, मेधा पाटील, पूजा कटके, मीना पोवार, सविता परब, मनाली भोसले, सरिता भोसले, चारूलता चव्हाण, मृदुला भोसले, अनुजा देशमुख, रूपाली पोवार, राधिका कुलकर्णी, आदी वकील महिला सहभागी झाल्या होत्या. प्रत्येक दुचाकीच्या मागे बसलेल्या महिला, तरुणींकडे सामाजिक संदेश देणारे फलक होते. रॅलीत शिस्तीचे पालन४रॅलीची सुरुवात झाल्यानंतर सर्व महिलांनी गाड्यांचा वेग ३० कि.मी. प्रतिवेग ठेवला होता. बहुसंख्य महिलांनी पांढऱ्या रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या, तर प्रत्येक तरुणी, महिलांनी आपल्या उजव्या दंडावर काळी फीत लावून कोपर्डी अत्याचार घटनेचा निषेध नोंदविला.पथनाट्याचे सादरीकरण ४छत्रपती शहाजी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मराठा आरक्षण व शेतकरी आत्महत्यांबद्दल दसरा चौक येथील मैदानावर पथनाट्य सादर केले. यामध्ये रविना पोवार, शिवानी भोई, ज्योती कापले, वैष्णवी चौगुले, अमित चव्हाण, गणेश कांबळे, रोहित कांबळे, नीलेश खोले, आदी विद्यार्थी सहभागी झाले होते.मेकॅनिकचा सहभाग४रॅलीतील महिलांच्या दुचाकी नादुरुस्त झाल्यातर त्या तत्काळ दुरुस्त करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा टू-व्हीलर मेकॅनिक असोसिएशनचे संजय पाटणकर, रवी कोंडेकरी, माधव सावंत, बबन सावंत, आदी मेकॅनिक सहभागी झाले होते, तर विविध संस्थांच्यावतीने रॅलीत सहभागी झालेल्या महिला, तरुणींकरिता कोकम सरबत, पाण्याच्या पाऊचची सोय करण्यात आली होती.१) मराठा मूक मोर्चासाठी सकल मराठा समाजाच्या रणरागिणींनी गुरुवारी सकाळी जनजागृतीसाठी दुचाकी रॅली काढली. यामध्ये संयोगीताराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती, अरुंधती महाडिक, सई खराडे, महापौर अश्विनी रामाणे, प्रतिमा पाटील, शमा मुल्ला, आदी सहभागी झाल्या होत्या. २) मराठा मूक मोर्चासाठी सकल मराठा समाजाच्या रणरागिणींनी गुरुवारी सकाळी जनजागृतीसाठी दुचाकी रॅली काढली. या दरम्यान रॅली शिवाजी चौकात आल्यानंतर चिमुकलीच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अरुंधती महाडिक, संयोगीताराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती, महापौर अश्विनी रामाणे, प्रतिमा पाटील, माजी महापौर सई खराडे, आदी मान्यवर महिला उपस्थित होत्या.