शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
3
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
4
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
5
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
6
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
7
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
8
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
9
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
10
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
11
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
12
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
13
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
14
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
15
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
16
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
17
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
18
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
19
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
20
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम

भराडी देवीच्या दर्शनासाठी जनसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2016 00:12 IST

देवीच्या चरणी लाखो भाविक लीन

मालवण : आई भराडी देवीच्या दर्शनासाठी आतुरलेले भाविक आणि लेकरांच्या भेटीची ओढ असलेल्या आई भराडी देवीच्या चरणी लाखो भाविक लीन होत अवघी आंगणेवाडीनगरी भक्तिमय वातावरणाने न्हाऊन गेली. गुरुवारी पहाटे अडीच वाजल्यापासून दर्शनास सुरुवात झाली. सायंकाळपासून भाविकांच्या गर्दीने आंगणेवाडी फुलून गेली. देवी भराडीच्या अगाध शक्तीच्या अभूतपूर्व संगमाचा ‘याची देही याची डोळा’ प्रत्यय भाविकांना आला. दरम्यान, आंगणेवाडी यात्रेच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रशासकीय यंत्रणांच्या नियोजनबद्ध आखणीमुळे यात्रा सुरळीत पार पडली. यामध्ये पोलीस प्रशासन, ग्रामस्थ मंडळ, तसेच सर्व प्रशासकीय यंत्रणांच्या चोख नियोजनामुळे गर्दीवर नियंत्रण मिळविण्यात येत होते. यात्रेत अनुचित प्रकार अथवा अपघात घडू नये, यासाठीही विशेष लक्ष ठेवण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे राजकीय नेते, तसेच सिनेकलाकार यांचीही उपस्थिती मोठ्या संख्येने लाभली. आंगणेवाडी मंडळ आणि जिल्हा प्रशासन यांच्याकडून भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी स्वतंत्र आठ रांगांची व्यवस्था करण्यात आली होती. शेकडो पोलीस बंदोबस्तासह सीसीटीव्ही कॅमेरेही यात्रोत्सवावर लक्ष ठेवून होते. रात्री भाविकांच्या गर्दीने व आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिर परिसर झळाळून गेला होता. आज, शुक्रवारी मोडयात्रेने आंगणेवाडी यात्रोत्सवाची सांगता होणार आहे. ‘व्हीआयपीं’ची मांदियाळी आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या यात्रोत्सवात पहिल्या दिवशी ५ ते १० लाख भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. यात माजी मुख्यमंत्री नारायण राणे, नीलम राणे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, परिवहनमंत्री दिवाकर रावते, शिक्षणमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, कल्याण-डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर, आमदार राम कदम, भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्यासह अनेक राजकीय नेते देवीचरणी लीन झाले. सुलभ नियोजन : प्रशासन यशस्वी राज्यभरातून येणाऱ्या भाविकांसाठी आठ रांगा, तसेच मुखदर्शनाची सुविधा मंडळाकडून देण्यात आली होती. यासह ‘व्हीआयपी’, तसेच अपंग व ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र रांग ठेवण्यात आली होती. एस.टी. प्रशासनाकडून विशेष १५० गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. दोन दिवस चालणाऱ्या जत्रेत शेकडो पोलीस कर्मचारी, ३५ पोलीस अधिकारी अशी पोलीस यंत्रणा बंदोबस्तासाठी तैनात झाली आहे. तसेच यावर्षी रेडिओ सुरक्षा प्रणालीचा वापर, आपत्ती व्यवस्थापनाच्यावतीने आरोग्य विभाग, महसूल, ग्रामपंचायत, पंचायत समिती, याबरोबरच आंगणेवाडी मंडळाच्यावतीने भाविकांना सुलभ दर्शनासाठी सुविधा पुरवल्या होत्या. मालवणी खाजाची आवक वाढली आंगणेवाडी यात्रेत विविध प्रकारची दुकाने सजली होती. सर्वाधिक मागणी मालवणी खाजाला होती. तसेच मिठाई दुकाने, हॉटेल, कपडे, अन्य प्रकारच्या सर्व गृहोपयोगी वस्तू, खेळणी यांनी सजलेल्या दुकानांत मोठी गर्दी होती. यात्रेत शेकडो व्यापाऱ्यांची कोट्यवधीची उलाढाल झाली. स्पर्धांचा थरार शिवसेना आयोजित खासदार विनायक राऊत यांच्यावतीने खासदार चषक शूटिंगबॉल स्पर्धा आणि मनसेचे परशुराम उपरकर यांच्यावतीने राजगड चषक कबड्डी स्पर्धेला भाविक, तसेच क्रीडाप्रेमींचा चांगला प्रतिसाद लाभला. आंगणेवाडी यात्रेची धूम सुरू असताना क्रीडाप्रेमी स्पर्धांचा थरार अनुभवत होते. या स्पर्धा रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या.