शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी देसाई यांची बदली झाल्यास जनआंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : लोकाभिमुख प्रशासकीय कामकाज करणारे आणि कर्तव्यदक्ष अशी ख्याती असलेले जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची मुदतपूर्व ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : लोकाभिमुख प्रशासकीय कामकाज करणारे आणि कर्तव्यदक्ष अशी ख्याती असलेले जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची मुदतपूर्व अचानक बदली केल्यास जनआंदोलन केले जाईल, असा इशारा कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ई - मेलव्दारे दिला. दरम्यान, जिल्हाधिकारी देसाई यांच्या बदलीचे वृत्त प्रसिध्द होताच विविध स्तरातून नाराजीचा सूर उमटला. मुदतपूर्व बदली झाल्यास जनआंदोलन करण्याचीही तयारीही विविध संस्था, संघटना, शेतकरी संघटनांनी केले आहे.

कृती समितीचे अशोक पोवार, रमेश मोरे, भाऊ घोडके, चंद्रकांत सूर्यवंशी, संभाजीराव जगदाळे, विनोद डुणूंग, चंद्रकांत पाटील, अंजूम देसाई, दादा लाड, अॅड. रणजित गावडे, भरत रसाळे, राजेश वरक यांनी हे निवेदन पाठवले आहे. या निवदेनात म्हटले आहे की, दीड वर्षात जिल्हाधिकारी देसाई हे प्रभावीपणे काम करत आहेत. महापूर, कोरोना या आपत्तीत त्यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून रात्रं-दिवस प्रशासकीय यंत्रणा कामाला लावली. जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला, मरगळलेले प्रशासन गतिमान केले. महसूलमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी ते आग्रही आहेत. पाच-सहा किलोमीटर दुर्गम भागात पायपीट करुन लोकांपर्यंत पोहोचून ते सुविधा देण्याचे काम करत आहेत. त्यामुळे त्यांचा कार्यकाल पूर्ण होईपर्यंत त्यांची बदली करु नये.

---

चांगले अधिकारी नको आहेत काय

जिल्हाधिकारी देसाई यांचा कार्यकाल शिल्लक असताना बदलीसाठी प्रयत्न करण्यामागचे गौडबंगाल काय, राजकीय नेत्यांना कोल्हापूरच्या विकासासाठी चांगले अधिकारी ठेवायचेच नाहीत का, असे झाल्यास महाराष्ट्रात हुकुमशाही चालू आहे असा समज होईल, असे समितीने म्हटले आहे.

---