इतर मागासवर्ग गटातून अमरसिंह पाटील यांनी निर्णायक आघाडी घेतल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली. यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक व कार्यकर्त्यांनी येऊन, तर काही नेत्यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या. पाटील यांच्या निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांची संख्या मोठया प्रमाणावर वाढल्याने पोलिसांनी गर्दी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
यावेळी यशवंत शिक्षण समूहाचे सचिव डॉ. जयंत पाटील, कोडोली अर्बन बँकेचे अध्यक्ष राहुल पाटील, वारणा साखर कारख्यान्याचे संचालक सुभाष पाटील, माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नितीन कापरे, सदस्य माणिक मोरे, सर्वोदय सोसायटीचे अध्यक्ष लक्ष्मण कुलकर्णी, मानसिंग पाटील, माधव पाटील, सचिन जाधव, जनसुराज्य पक्षाचे पक्षप्रवक्ते ॲड. राजेंद्र पाटील, मोहन पाटील, गणेश शेडगे, राजेंद्र कापरे आदींनी शुभेच्छा दिल्या.
अमरसिंह पाटील यांना शुभेच्छा देताना यशवंत शिक्षण समूहाचे सचिव डॉ. जयंत पाटील, कोडोली अर्बन बँकेचे अध्यक्ष राहुल पाटील, नितीन कापरे, माणिक मोरे, माधव पाटील, अमोल मेनकर, गणेश शेडगे, मोहन पाटील सचिन फल्ले आदी.