शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ६९ गावांत ‘जलयुक्त शिवार अभियान’

By admin | Updated: November 9, 2015 00:31 IST

पालकमंत्री : ‘कोल्हापूर पर्यटन हब’ बनवण्यासाठी आराखड्यावर काम

कोल्हापूर : राज्य सरकारने ‘जलयुक्त शिवार अभियान’ ही महत्त्वाकांक्षी योजना राबवून लोकसहभागातून केवळ १४०० कोटी रुपयांत २४.५९ टी. एम. सी. जलसाठा निर्माण करून सहा लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणले आहे. या योजनेत जिल्ह्यातील ६९ गावे निवडण्यात आली आहेत, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.राज्य शासनाच्या वर्षपूर्तीनिमित्त माहिती देताना वर्षभरात राबविलेल्या विविध योजना व घेण्यात आलेल्या लोकाभिमुख निर्णयांचे विवेचन पालकमंत्र्यांनी केले.पालकमंत्री पाटील म्हणाले, पहिल्याच वर्षात राज्यातील ६ हजार १८० गावांत १ लाख २० हजार कामे हाती घेऊन लोकसहभागासह केवळ १४०० कोटी रुपयांत २४.५९ टी. एम. सी. जलसाठा निर्माण करून सहा लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यात आले आहे. ते पुढे म्हणाले, जिल्हास्तरावर जिल्हा नियोजनाच्या वार्षिक आराखड्यात भरीव वाढीसह २२६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याबरोबरच नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी साडेसहा कोटी रुपये व अनुसूचित जाती उपाययोजनेसाठी ९३ कोटी ५४ लाखांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. शिवडाव-सोनवडे घाटरस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यात यश आले आहे. नाबार्ड योजनेंतर्गत १५ कोटी अर्थसंकल्पीय तरतूद २७.५० कोटी, तर ‘सीआरएफ’च्या माध्यमातून मोठ्या पुलांसाठी ४९ कोटींचा भरीव निधी दिला आहे. ‘पर्यटन हब’ म्हणून कोल्हापूरच्या नावलौकिकात भर घालण्यासाठी महालक्ष्मी व ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र यांचे विकास आराखडे तयार केले जात आहेत. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले, जलयुक्त शिवारसाठी निवडलेली गावे ही सरकारच्या निकषांनुसारच निवडली आहेत. एखादे गाव लोकसहभागातून स्वत:हून पुढे येत असेल तर त्यांचा समावेश यामध्ये केला जाईल. तसेच कृषी पर्यटनांतर्गत ऊस उत्पादक वाढ, मध संवर्धन व मत्स्य व्यवसाय हे तीन कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. गरज पडल्यास धरणांच्या पाण्यावर आरक्षणसध्या जिल्ह्यात कोठेही पाणीटंचाईची समस्या भेडसावत नाही. तरीही चिकोत्रा धरणक्षेत्रातील पाणी हे आरक्षित केले आहे. पिण्यासाठी व त्यानंतर शेतीसाठी हे पाणी राहणार आहे. गरज पडल्यास इतर धरणांतील पाण्यावरही असेच आरक्षण ठेवले जाईल, असे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी सांगितले.टोलप्रश्नी दिवाळी पाडव्याला बैठकटोल प्रश्नावर चर्चा करण्यासाठी टोलविरोधी कृती समितीला गुरुवारी (दि. १२) दिवाळी पाडव्यादिवशी निमंत्रित केले जाणार आहे. दुपारी चारच्या सुमारास त्यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा करून त्यांना १ डिसेंबरनंतर कोणत्याही परिस्थितीत टोल राहणार नाही, याची हमी देऊ, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.