कोल्हापूर : ‘लोकमत नातं रक्ताचं’ या उपक्रमांतर्गत अखिल भारतवर्षीय दिगंबर जैन युवा परिषद, कोल्हापूर, महावीर गाट फाऊंडेशन आणि वीर सेवादल शाखा, रुईकर कॉलनी यांच्यावतीने शनिवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले.
कदमवाडी रोड येथील श्रुत सन्मती भवनात झालेल्या या शिबिरात रक्तदात्यांनी सहभाग घेतला. यावेळी ज्येष्ठ उद्योजक व्ही. बी. पाटील, महावीर गाट, हुपरी नगराध्यक्ष जयश्री गाट, माजी महापौर सूरमंजिरी लाटकर, राजेश लाटकर, अभिषेक पाटील, डॉ. सावनी चौगुले, स्नेहलता कापसे, रेश्मा शहा, राजेश लाटकर, अमित गाट, सत्यजित कदम, शैला पाटील, अभिषेक सवदत्ती, वीरेंद्र मगदूम, निखिल नरसगोंडा, विजेंद्र माने, डॉ. रोहन अथणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या शिबिरासाठी जैन समाजातील विविध संघटनांनी परिश्रम घेतले.
--
फोटो नं १००७२०२१-कोल- जैन समाज
ओळ : ‘लोकमत नातं रक्ताचं’ या उपक्रमांतर्गत शनिवारी कदमवाडी येथे दिगंबर जैन युवा परिषद, महावीर गाट फाऊंडेशन आणि वीर सेवादलाच्यावतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. माजी महापौर सूरमंजिरी लाटकर यांनी रक्तदान केले. यावेळी उद्योजक व्ही. बी. पाटील यांच्या हस्ते अभिषेक पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
---