शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचे फासे उलटे पडले; पुतिन यांची तगडी ऑफर, भारत रशियाकडून तेल खरेदी वाढवणार?
2
प्रशांत किशोरांचा निर्णय झाला! ब्राह्मणबहुल मतदारसंघातून उतरणार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात
3
SIP नं बनाल कोट्यधीश की PPF नं; ₹९५,००० वार्षिक गुंतवणूकीवर कोण बनवेल करोडपती, खरा चॅम्पिअन कोण?
4
आयफोन १७ ची किंमत लीक, जरा थांबा...! किडनी विकावी लागणार की नाही, एवढी असेल...
5
शीना बोरा हत्याकांडात १३ वर्षांनी मोठा ट्विस्ट! इंद्राणी मुखर्जीची मुलगी असं काय बोलली की केसची दिशाच बदलली?
6
मारुतीची नवी व्हिक्टोरिस SUV लॉन्च! 5-स्टार सेफ्टी, 10.25-इंचांचे इंफोटेनमेंट, 360 डिग्री कॅमेरा अन् बरंच काही; जाणून घ्या सविस्तर
7
मराठा समाजानंतर आता OBC समाजासाठी उपसमितीची स्थापना; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
8
TCS कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! कंपनीने दिवाळीपूर्वीच कर्मचाऱ्यांना दिलं 'वेतनवाढी'चं गिफ्ट
9
मंत्रिमंडळ १५ निर्णय; मुंबई-ठाणे नवीन मेट्रो, लोकल ट्रेन खरेदी, पुणे-लोणावळा चौपदरीकरण मंजूर
10
'हार्ले-डेव्हिडसन'बाबत डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा खोटा; टॅरिफ नाही, या कारणासाठी भारतातून कंपनी बाहेर गेली
11
'पैसे बचाओ' पॉलिसी! ९ ते ५ दरम्यान कर्मचाऱ्यांवर 'वॉच', 'फोनाफोनी'चाही घेणार 'हिशेब'; Amazon मध्ये काय घडतंय?
12
Ola Electric च्या शेअरनं पकडला तुफान 'स्पीड'; ६ दिवसांत ४२% ची वाढ, गुंतवणूकदार मालामाल
13
"हा माझा पती... नाही तो माझा पती"; लाथाबुक्क्या हाणल्या, बाटल्या फेकून मारल्या, पोलीस स्टेशनसमोर महिलांमध्ये जुंपली! 
14
बस्तर पूरग्रस्तांच्या मदतीला धावले मुख्यमंत्री! बचावकार्यात हलगर्जीपणा चालणार नाही; अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश
15
Astro Tips: लग्नाची सप्तपदी आयुष्यभराची तप्तपदी होऊ नये म्हणून लग्नापूर्वी घ्या 'ही' काळजी!
16
"ट्रम्प यांना अर्थशास्त्राची काहीच समज नाही..," 'या' दिग्गज विश्लेषकानं दिला इशारा
17
चांदीने दिला तब्बल ४०% परतावा! पहिल्यांदाच १.२५ लाखांचा टप्पा पार, ‘या’ कंपन्यांना मोठा फायदा
18
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार; NCP ची तातडीची बैठक, राजकीय हालचाली वाढल्या
19
मध्यरात्री पीजीमध्ये शिरला मास्कमॅन; तरुणीचे हात-पाय बांधले अन्...; धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ
20
फिटनेस टेस्ट पास झाला! आता हा ठरू शकतो हिटमॅनच्या वाटेतील सर्वात मोठा अडथळा; इरफान पठाण म्हणाला...

लोककलेच्या माध्यमातून मराठीचा जागर

By admin | Updated: March 1, 2017 00:11 IST

‘मराठी आमुचि मायबोली’ : संत ज्ञानेश्वर, तुकारामाचे अभंग, महाराष्ट्र दर्शनाची पालखी

कोल्हापूर : संत परंपरा, भारूड, पोवाडा, लावणी, संगीत नाट्यपदांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवित लोककलेच्या माध्यमातून मराठीचा जागर करण्यात आला. निमित्त होते ‘मराठी आमुचि मायबोली’ कार्यक्रमाचे.केशवराव भोसले नाट्यगृहात शिवाजी विद्यापीठ, उच्च व तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘मराठी आमुचि मायबोली’ हा कार्यक्रम झाला. उद्घाटन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, अभिनेता पुष्कर श्रोती यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रंसगी कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, अन्य भाषा जरूर शिकावी; मात्र त्याचसोबत मराठी भाषेचा अभिमान बाळगणे गरजेचे आहे.डॉ. कुणाल खेमनार म्हणाले, मराठी भाषा वाहत्या नदीप्रमाणे आनंद देणारी आहे. तिचा प्रचार व प्रसार युवा पिढीने केला पाहिजे. कार्यक्रमाच्या प्रारंभीच महाराष्ट्र दर्शन घडविणाऱ्या पालखी सोहळ्याने झाली. त्यानंतर धनंजय म्हसकर आणि सुचित्रा भागवत, सोनाली कर्णिक यांनी सादर केलेल्या रूणझुण रूणझुण रे भ्रमरा, रंगा येई हो, वृक्षवल्ली आम्हा सोया, खेळ मांडियेला या संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांचे अभंगाने सर्वांना तल्लिन केले. पाठोपाठ उदेश उमाप यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझल खान वधाचे वर्णन पोवाड्यातून सादर केले. त्यानंतर बहिणाबाई, शांता शेळके यांच्या कविता, मंगळागौर, लग्नगीत, भोंडला, संगीत नाट्यपदांसह विद्रोही साहित्य, मुंबईची लावणी, विनोदी प्रहसन, स्वातंत्र्य संग्रामाचे सादरीकरण केले.कविता व नाट्यवाचन पुष्कर श्रोती यांनी केले. भारूड निरंजन भाकरे यांनी सादर केले. कार्यक्रमाचे दिग्दर्शन सुभाष नकाशे, लेखन अजित परब व मंदार खराडे, संगीत संयोजन व गायक अजित परब, नृत्यदिग्दर्शन मीनल भिके, तर निर्मिती सूत्रधार सुनील कुलकर्णी यांनी केले होते. यावेळी विभागीय सहसंचालक डॉ. अजय साळी, शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवेडकर, परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांच्यासह मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहात सोमवारी सायंकाळी शिवाजी विद्यापीठ, उच्च व तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘मराठी आमुचि मायबोली’ या कार्यक्रमात कलाकारांनी पालखी सोहळ्यातून महाराष्ट्राचे दर्शन घडविले.