शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शोभायात्रेत संस्कृतीचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2016 00:44 IST

गुढीपाडव्याचे स्वागत : नरेंद्राचार्य महाराज भक्त मंडळाचे आयोजन

कोल्हापूर : ‘गण गण गणात बोते’चा अखंड जयघोष, धनगरी ढोल, टाळमृदंग, लेझिम, झांज पथक, हलगी या वाद्यांच्या आवाजात शुक्रवारी ज्वलंत सामाजिक प्रश्न व भारतीय संस्कृतीचा जागर करत भव्य शोभायात्रा निघाली. जगदगुरू रामानंदाचार्य स्वामी नरेंद्र महाराज दक्षिणपीठ नाणीजधाम यांच्या सुवर्णमहोत्सवी वर्ष व गुढीपाडवा या निमित्ताने येथील जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज भक्त सेवा मंडळ यांच्यातर्फे शोभायात्रा आयोजित करण्यात आली होती. गांधी मैदानातून दुपारी साडेतीन वाजता शोभायात्रेला प्रारंभ झाला. ढोल ताशे, लेझीम पथक, मर्दानी खेळ, धनगरी ढोल, गजनृत्य, झांज पथक, हालगी या वाद्याच्या निनादात निघालेली शोभायात्रा पाहण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूनी गर्दी झाली होती. खरी कॉर्नर, महाव्दार रोड, पापाची तिकटी, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, माळकर तिकटी, जुना बाजार, बिंदू चौक, साई मंदिर टेंबे रोड या मार्गावरून फिरून शोभायात्रेची सांगता गांंधी मैदानात झाली. सेवा मंडळाचे जिल्हा अध्यक्ष कृष्णात माळी, महिला जिल्हा अध्यक्ष मनिषा मगदूम यांच्यासह हिंदू संग्राम सेना, युवा सेना यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदींनी नियोजन केले. जल है तो कल हैहिंदू धर्म खतरे मे है, गो हत्या बंद करो, मुलींना वाचवा, मुलींना शिकवा, धरती माँ करे पुकार, पर्यावरण मे करो सुधार, तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा, विश्वका कल्याण हो, बोलणार असाल तर विनम्र बोला, धुम्रपान छोडो आयु बढाओ, रक्तदान श्रेष्ठ दान, सभी हिंदुओंमे एकता हो, अधर्म का नाश हो, स्त्री भ्रूणहत्या बंद करा, संयम पाळा आत्महत्या टाळा, जल है तो कल है, जो दिसेल तिथे थुंकेल त्याच्यावर जग हसेल, अपव्यय टाळा, पाणी वाचवा असे फलक हातात घेऊन महिला, पुरूष, मुले सहभागी झाले होते.संस्कृतीचे दर्शनभव्य रथ, भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारी विविध वेषभूषा केलेले पथक, संतांच्या वेशभूषेतील तरूण, भगवा ध्वज व गुढी घेतलेल्या महिला, पुरूष, टाळकरी भजन, विविध लोकनृत्य तरूणी, छत्रपती शिवराय व मावळ्यांच्या वेशभूषेतील कलाकार यांचे विशेष आकर्षण राहिले. नाचणारा घोडा आणि दोन काठीवर चालणाऱ्या व्यक्तीने विशेष लक्ष वेधले.