शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जे. पी. नाईक स्मारकासाठी केवळ ६० लाख

By admin | Updated: June 8, 2015 00:54 IST

राज्य सरकारने निधी द्यावा : दोन कोटी ३० लाख खर्च अपेक्षित, कामे अपूर्ण

रवींद्र येसादे - उत्तूर -ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. जे. पी. नाईक यांच्या स्मारकाचे काम बहिरेवाडी (ता. आजरा) येथील जन्मगावी सुरू आहे. लोकशाही आघाडी सरकारकडून दोन कोटी ३० लाख खर्चाचे स्मारक मंजूर करण्यात आले. त्यापैकी ६० लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून, या ६० लाखांत केवळ स्मारकाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. उर्वरित निधीची पूर्तता राज्य सरकारने करावी, अशी मागणी शिक्षणप्रेमींकडून होत आहे.माजी जलसंपदामंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून स्मारकाचे काम सुरू करण्यात आले. आघाडी सरकारने ६० लाखांचा निधी मंजूर केला. त्यापैकी ४० लाखांचा निधी कामासाठी उपलब्ध करून देण्यात आला. केवळ स्मारकासाठी ६० लाखांची तरतूद करण्यात आली.स्मारकासह संरक्षण भिंत, सांस्कृतिक सभागृह, सुशोभीकरण, तलाव सुशोभीकरण, आदी कामे करावयाची आहेत. युती शासन आल्यानंतर या स्मारकासाठी एकाही रुपयाची तरतूद करण्यात आली नसल्याचे समजते. यासाठी आमदार हसन मुश्रीफ यांनी शासनदरबारी पाठपुरावा करावा, अशी मागणी होत आहे.मिळालेल्या निधीचा वापर डॉ. जे. पी. नाईक यांच्या स्मारकासाठी करण्यात येत आहे. उर्वरित रक्कम मिळाल्यानंतरच सर्व कामे पूर्ण होणार असल्याचे अभियंता जयसिंग चव्हाण यांनी सांगितले.चंद्रकांतदादांनी स्मारकाच्या निधीसाठी प्रयत्न करावेतसार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी हे स्मारक पूर्ण होण्यासाठी निधीची तरतूद करून द्यावी व लवकरात लवकर हे स्मारक पूर्ण व्हावे, अशी अपेक्षाही ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.