शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

जे. जे. मगदूम यांचे कार्य प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:19 IST

जयसिंगपूर : येथील डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगमध्ये धन्वंतरी, शिक्षणमहर्षी स्व. डॉ. जे. जे. मगदूम यांची ९१ ...

जयसिंगपूर : येथील डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगमध्ये धन्वंतरी, शिक्षणमहर्षी स्व. डॉ. जे. जे. मगदूम यांची ९१ वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय मगदूम व उपाध्यक्षा अ‍ॅड. सोनाली मगदूम यांच्याहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.

अध्यक्ष डॉ. मगदूम म्हणाले, स्व. मगदूम यांनी जयसिंगपूर शहरासह पंचक्रोशीतील सर्वसामान्य रुग्णांना कित्येक वर्षे आरोग्य सेवा देणेचे आदर्शवत कार्य केले. त्यांनी डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्टचा वटवृक्ष उभा करून गेली ४३ वर्षे इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी व नर्सिंग कॉलेज तसेच शाळांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय करून ठेवल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी प्र. प्राचार्या डॉ. एस. बी. पाटील, प्रा. पी. पी. पाटील, ए. बी. घोलप, एल. व्ही. कुलकर्णी यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते. उपाध्यक्षा अ‍ॅड मगदूम यांचे मनोगत झाले. स्वागत डॉ. एस. बी. पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन ए. बी. यादव, विनायक चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन डी. आर. माने यांनी केले.

फोटो - ३११२२०२०-जेएवाय-०१

फोटो ओळ - जयसिंगपूर येथे स्व. डॉ. जे. जे. मगदूम यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. विजय मगदूम, अ‍ॅड. सोनाली मगदूम, डॉ. एस. बी. पाटील, पी. पी. पाटील यांच्यासह प्राध्यापक उपस्थित होते.