शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बनावट नोटांच्या टोळीने दहा कोटींच्या नोटा बाजारात खपविल्याचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 00:43 IST

कोल्हापूर : बनावट नोटांचा कारखाना काढून कोट्यवधी रुपयांचे चलन बाजारात आणणाऱ्या टोळीने दोन महिन्यांच्या कालावधीत सुमारे दहा कोटी रुपये ...

कोल्हापूर : बनावट नोटांचा कारखाना काढून कोट्यवधी रुपयांचे चलन बाजारात आणणाऱ्या टोळीने दोन महिन्यांच्या कालावधीत सुमारे दहा कोटी रुपये बाजारात आणल्याचे गुन्हे अन्वेषण पथकाच्या तपासात उघड होत आहे. या प्रकरणी आणखी कोणाचा हात आहे का, याचाही तपास सुरू आहे. कापड व्यापारी राहुल नेसरी (वय ३०, रा. भडगाव, ता. गडहिंग्लज) याने या नोटा खपविण्यात पुढाकार घेतल्याचा पोलिसांना संशय आहे.या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने इचलकरंजी येथे कारवाई करून टोळीचा म्होरक्या जीवन वरुटे, सागर कडलगे यांना अटक केली. त्यांच्याकडून १० लाखांच्या बनावट नोटा व त्या तयार करण्यासाठी लागणारी सामग्री जप्त केली. त्यानंतर कापड व्यापारी राहुल नेसरी यालाही अटक केली. त्याने व्यवसायाच्या माध्यमातून जास्त नोटा बाजारात आणल्याचा पोलिसांचा संशय आहे.या प्रकरणी पोलिसांनी इचलकरंजी येथील दातार मळ्यात रविवारी (दि. १७) बनावट नोटांच्या कारखान्यावर छापा टाकून दोघांना अटक केली होती. तेव्हापासून या टोळीतील इतर संशयितांचा पोलीस शोध सुरू आहे. टोळीने बनावट नोटा खपवून त्याद्वारे मिळवलेली संपत्ती कुठे लपविली आहे; किती नोटा छापल्या; महाराष्ट्राबाहेर त्यांचे एजंट आहेत का? हुबळी, धारवाड, आदी ठिकाणी टोळीचे कनेक्शन आहे का? याचा शोध पोलीस घेत आहेत.दोन महिन्यांत खपविल्या नोटादोन महिन्यांच्या या कालावधीत या टोळीने सुमारे १० कोटी रुपयांचा बनावट नोटा खपविल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. विशेष म्हणजे या कालावधीत विधानसभा निवडणुका होत्या. त्यामुळे नेमक्या किती बनावट नोटा बाजारात आल्या, याचाही तपास पोलीस कसोशीने करीत आहेत.