शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

आता १८ वर्षांपर्यंतच्या मुलांवर उपचार करणे सुसह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2015 00:25 IST

जिल्हा रुग्णालयांमधून मोफत उपचार : ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य’ कार्यक्रम जुलैपासून

गणेश शिंदे - कोल्हापूर --विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ व्हावे, शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढावी, या उद्देशाने केंद्र शासन १८ वर्षांपर्यंतच्या सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य’ कार्यक्रम जुलै २०१५ पासून कोल्हापूर जिल्ह्यात सुरू करणार आहे. तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना आणि आता सत्ताधारी भाजप सरकारने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.तत्कालीन केंद्र सरकारमधील काँग्रेस आघाडीने २१ नोव्हेंबर २०१३ रोजी राज्यात सर्वत्र ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना’ सुरू केली. कोल्हापूर जिल्ह्यात ३० रुग्णालयांत ही योजना सुरू आहे. यामध्ये १०५ आजार आहेत. या नोंदणीकृत रुग्णालयामध्ये विद्यार्थ्यांना उपचार घेता येणार आहे. मात्र, तो शाळेचा विद्यार्थी पाहिजे, अशी अट आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमामध्ये या वयोगटातील मुले ही जन्मजात आजारी असली पाहिजेत. (उदा. जन्मजात मोतीबिंदू, बहिरेपणा, व्यंग, आदी). त्याचबरोबर ४९ आजार हे दंतांशी संबंधित आहे. सध्या ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य’ कार्यक्रमाची जनजागृती करण्यासाठी गगनबावडा, राधानगरी येथे शिबिरे सुरू आहेत. आतापर्यंत चार रुग्णालयांचा सामंजस्य करारकोल्हापूर जिल्ह्यात राजीव गांधी जीवनदायी योजनेमधून ३० रुग्णालयांमध्ये उपचार घेता येतात. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमासाठी आतापर्यंत कोल्हापुरातील डॉ. डी. वाय. पाटील (कदमवाडी), मसाई रुग्णालय (लुगडी ओळ, माळकर तिकटी), जयसिंगपूर येथील पायस रुग्णालय, महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज रुग्णालय यांनी सामंजस्य करार (एमओयू) केला आहे. कोल्हापुरातील २४, तर गडहिंंग्लजमधील ३ तसेच इचलकरंजी, वडगाव, जयसिंगपूर या ठिकाणी प्रत्येकी एक अशा ३० रुग्णालयांमध्ये राजीव गांधी जीवनदायी योजना सुरू आहे.यांचे राहणार नियंत्रणराष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमावर (आरबीएसके) जिल्हा शल्यचिकित्सक व समन्यवयक यांचे नियंत्रण असणार आहे. १०५ पैकी ६८ आजारांवरील पैसे हे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (एनआरएचएम) मधून संबंधित रुग्णालयांना देण्यात येणार आहेत. याला जिल्हा शल्यचिकित्सक मंजुरी देणार आहेत. मात्र, एखाद्या विद्यार्थ्याने ‘राजीव गांधी जीवनदायी’मधील ३७ आजारांवर उपचार घेतले, तर त्याचे पैसे हे नॅशनल इन्श्युरन्स कॉर्पोरेशन (एनआयसी)मधून या रुग्णालयांना मिळणार आहेत. दोन्ही योजनांमधील हा आहे फरक...राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेमध्ये एका कुटुंबाला दीड लाख रुपये खर्च शासन देते, तर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमामध्ये खर्चाची कोणतीही मर्यादा नाही. तसेच ‘राजीव गांधी जीवनदायी’मध्ये उत्पन्नाची अट ही एक लाखापर्यंत आहे, पण राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमामध्ये उत्पन्नाची कोणतीही अट नाही.पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनी यांना राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचा लाभ होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आजार कमी होऊन शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे.- डॉ. अशोक देठे, जिल्हा समन्वयक, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना, कोल्हापूर.