शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

आयटी हब’ होण्याची कोल्हापुरात क्षमता : ललित कनोडिया--‘निर्यातवृद्धीस प्रोत्साहन’ विशेष परिसंवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 01:13 IST

कोल्हापूर : मुंबई, पुणेनंतर कोल्हापूर हे महत्त्वाचे ठिकाण आहे. येथे क्षमता असल्याने ‘आयटी हब’ होऊ शकते.

ठळक मुद्दे‘मेक इन कोल्हापूर’ला संधी मिळावी

कोल्हापूर : मुंबई, पुणेनंतर कोल्हापूर हे महत्त्वाचे ठिकाण आहे. येथे क्षमता असल्याने ‘आयटी हब’ होऊ शकते. अनेक मोठ्या कंपन्यांची कामे येथील ‘आयटी’ला साहाय्यभूत ठरणाºया घटकांकडून होऊ शकतात, असे प्रतिपादन इंडियन मर्चंट्स चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅँड इंडस्ट्रीचे (आयएमसी) अध्यक्ष व आयटी उद्योजक डॉ. ललित कनोडिया यांनी मंगळवारी येथे केले.कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅँड इंडस्ट्रीज व आयएमसी, वेसमॅकतर्फे आयोजित निर्यातवृद्धी प्रोत्साहन या विशेष परिसंवादात ते बोलत होते. राजर्षी शाहू स्मारक भवनातील या परिसंवादामध्ये त्यांनी ‘छोट्या शहरात आयटी उद्योगविस्ताराच्या संधी’ या विषयावर मार्गदर्शन केले. यानंतर ‘आयएमसी’चे महाव्यवस्थापक अरविंद प्रधान, सहसंचालक ख्याती नरवणे यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी शांताराम सुर्वे, संजीव शिवापूरकर, प्रकाश पुणेकर, वैभव सावर्डेकर, राजेंद्र मालू, महेश धर्माधिकारी, महेश सामंत, कल्लाप्पा पत्रावळे, अजित होनोले, शिवराज जगदाळे, आदी उपस्थित होते. दरम्यान, या परिसंवादापूर्वी ‘कोल्हापूर चेंबर’ची वार्षिक सभा झाली. यात चेंबरची इचलकरंजी शाखा सुरू करणे, विविध क्षेत्रांतील मार्केटिंग करणे, आदी ठराव करण्यात आले.‘मेक इन कोल्हापूर’ला संधी मिळावी‘मेक इन कोल्हापूर’ची अनेक उत्पादने आहेत. त्यांच्यासह पर्यटन, आय. टी. उद्योग, व्यापारी, कोल्हापूर ब्रॅँडला संधी देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने प्रयत्न करणे गरजेचे आहे. कोल्हापूरची विमानसेवा, नवे रेल्वे स्थानक, सुपरफास्ट रेल्वे या सुविधांसह येथे मोठा उद्योग येण्याची गरज असल्याची अपेक्षा या परिसंवादावेळी उद्योजक, व्यापाºयांनी व्यक्त केली. 

केंद्र सरकारतर्फे निर्यातीसाठी लागू केलेल्या अनेक प्रोत्साहनपर योजनांची माहिती उद्योजक आणि व्यापाºयांना नाही. सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांना निर्यातीची बाजारपेठ मिळण्यासाठी निर्यातदारांना प्रोत्साहन दिले जात आहे. कोल्हापुरातील वस्त्रोद्योग, लेदर, स्पोर्टस शूजसाठी कर्ज दिले जात आहे.- समर्थ चतुर्वेदी, मुख्य प्रबंधक,एक्झिम बँकनव्या निर्णयानुसार निर्यातदारांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील निर्यातदारांना चांगली संधी उपलब्ध आहे. त्या संधीचा त्यांनी लाभ घ्यावा.- सृष्टिराज अम्बस्था ,उपसरव्यवस्थापक, एक्स्पोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन