शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

वीज मीटर मध्ये फेरफार करणे पडेल महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:23 IST

कोल्हापूर: वीज मीटरमध्ये फेरफार करणे ‘महावितरण’च्या ग्राहकांना मोठा आर्थिक भुर्दंडसह अंधारात राहण्याची शिक्षा भोगावी लागते. चोरी केलेल्या विजेपेक्षा पाचपट ...

कोल्हापूर: वीज मीटरमध्ये फेरफार करणे ‘महावितरण’च्या ग्राहकांना मोठा आर्थिक भुर्दंडसह अंधारात राहण्याची शिक्षा भोगावी लागते. चोरी केलेल्या विजेपेक्षा पाचपट अधिक रक्कम दंड भरून भरण्यासह शिक्षादेखील होऊ शकते. शिक्षेची एवढी मोठी तरतूद असताना देखील वीज मीटरमध्ये फेरफार करून वीज चोरी करण्याचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. वीज मीटरमध्ये फेरफार केल्याच्या गेल्या वर्षभरात २१२ प्रकरणे आढळली. त्यासाठी १ कोटी ६२ लाखांचा दंड आकारण्यात आला आहे आणि तो वसूलही केला आहे.

मीटरमधील फेरफार हा वीज चोरीच समजला जात असल्याने वीज कलम कायदा १२६ नुसारच वीजचोरीसाठी जी कारवाई होती तीच मीटर फेरफार केल्यानंतर होते. ‘महावितरण’चे भरारी पथक कधीही येऊन मीटर तपासणी करू शकतात, याचसाठी विजेचे मीटर घरात न ठेवता बाहेर, दर्शनीबाजूला लावावे असे धोरण आहे. तरीदेखील वीज बिल कमी यावे म्हणून त्याला बायपास करून वीजचाेरीचे प्रकार केले जातात. मीटरमध्ये फेरफार करणे हा तर मोठा गुन्हा आहे, आणि हे निदर्शनास आल्यास ‘महावितरण’कडून कठोरातील कठोर कारवाई केली जाते. मीटर हळू करणे, मीटरमध्ये बिघाड करणे हे या कारवाईतच मोडतात.

चौकट

मीटर जप्ती आणि आर्थिक दंडही

मीटरमध्ये फेरफार केल्याचे तपासणी दरम्यान आढळून आल्यास महावितरणकडून कठोर कारवाई होते. संबंधित ग्राहकाकडे असणारी वीज उपकरणे, त्याचा सरासरी वापर हे पाहून त्याच्या चार ते पाचपट दंडाची आकारणी होते शिवाय वीज चोरी केल्याबद्दल गुन्हाही दाखल केला जातो.

चौकट

वीजचोरीसाठी अशीही चलाखी

महावितरणला आपण बिल देतोय म्हटल्यावर ती आपली मालकी आहे, असा ग्राहकांचा समज असतो पण विजेच्या वायरमध्ये देखील काही फेरफार करायचा म्हटला तर तो ‘महावितरण’ला कळवावा लागतो. मीटरला तर वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांशिवाय कोणीही हात लावू शकत नाही, पण तरीदेखील मीटरमधील वायरीत फेरफार करण्यासाठी चुंबक आणि नाण्याचा वापर करून वीजमीटरचा वेग नियंत्रित केला जातो. त्यातून महावितरणची फसवणूक केली जाते.

दंडाची रक्कम भरण्यासाठी मुदत

मीटरमधील फेरफार महावितरणच्या निदर्शनास आल्यास तात्पुरती दंडाची रक्कम भरण्याचे आदेश संबंधित ग्राहकाला नोटीस काढून दिले जातात. ग्राहकाला जर ही रक्कम मान्य असेल तर ती भरण्यास सात दिवसांची मुदत दिली जाते. परंतू यात रकमेबद्दल काही आक्षेप असतील तर तो ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांसमोर आक्षेप मांडू शकतो. ग्राहकांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतरच दंडाच्या रकमेसंबंधीचा अंतिम आदेश अधिकारी देतात. हा आदेश देण्यासाठीही त्यांना तीन दिवसांचे बंधन घालण्यात आले आहे.