शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

‘डीवायपी मॉल, सयाजी’चा ४ कोटी ६८ लाखांचा घरफाळा भरल्याचे स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:24 IST

कोल्हापूर : महानगरपालिकेचा गेल्या सात वर्षांपासून जवळपास पंधरा कोटी रुपयांचा घरफाळा चुकविल्याचा जाहीर आरोप झाल्यामुळे एका वेगळ्या कारणाने चर्चेत ...

कोल्हापूर : महानगरपालिकेचा गेल्या सात वर्षांपासून जवळपास पंधरा कोटी रुपयांचा घरफाळा चुकविल्याचा जाहीर आरोप झाल्यामुळे एका वेगळ्या कारणाने चर्चेत आलेल्या डीवायपी सिटी मॉलचा आतापर्यंत दोन कोटी ५५ लाख ३२५ रुपयांचा, तर ‘सयाजी हॉटेल’चा दोन कोटी १३ लाख १९ हजार ०६१ रुपयांचा घरफाळा भरल्याची बाब समोर आली आहे.

कोल्हापूरसारख्या श्रीमंत शहरातील नागरिकांच्या जीवनशैलीची साक्ष देणाऱ्या डीवायपी मॉल व हॉटेल सयाजी झालेल्या आरोपांमुळे वादात सापडले असून, व्यवस्थापनाने असेसमेंट करतेवेळी दिलेल्या कागदपत्रांची, तसेच कुळांसोबत झालेल्या भाडे करारांची चौकशी सुरू झाली आहे. त्यातून लवकरच सत्य बाहेर येईल, अशी अपेक्षा आहे.

सध्या गोकुळच्या निवडणुकीची धामधूम सुरू असून, या निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना सोबत घेऊन माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. गोकुळच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच आरोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाली. त्यातील पहिला आरोप हा डीवायपी ‘मॉल’वर झाला. मॉल व्यवस्थापनाने गेल्या सात वर्षांत महापालिकेचा पंधरा कोटी रुपयांचा घरफाळा चुकविला असल्याचा आरोप माजी खासदार धनंजय महाडिक यांनी केला. कूळ वापरातील इमारत असूनही मालक वापर दाखवून घरफाळा कमी लावून घेतला, कुळांबरोबर झालेले भाडे करार मॉल व्यवस्थापनाने महापालिकेला सादर केले नाहीत, असा महाडिक यांचा दावा आहे.

परंतु २०१४ सालात जेव्हा ही इमारत बांधून तयार झाली तेव्हा या इमारतीचे महापालिकेच्या घरफाळा विभागातील अधिकाऱ्यांनी असेसमेंट केले आणि त्याचा घरफाळा लागू केला. त्याची बिले २०१४ पासून २०२० सालापर्यंत माॅल व्यवस्थापनाला दिली. त्याप्रमाणे व्यवस्थापनाने तो घरफाळा धनादेशाद्वारे भरला आहे. कोणतीही थकबाकी नाही. त्याची नोंद महापालिकेच्या दप्तरी आहे. आतापर्यंत सर्व काही सुरळीत सुरू होते; परंतु धनंजय महाडिक यांनी तक्रार करताच मूळ कागदपत्रे, भाडे करारपत्र, भरलेला घरफाळा या सगळ्या गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत.

‘सयाजी’नेही भरले २ कोटी १३ लाख-

डीवायपी सिटी मॉलच्या मागील बाजूला सयाजी हॉटेल असून, त्याचाही गेल्या सात वर्षांतील सुमारे २ कोटी १३ लाख, १९ हजार ०६१ रुपयांचा घरफाळा डी. वाय. पाटील हॉस्पिटॅलिटी प्रा. लि.तर्फे डायरेक्टर पृथ्वीराज संजय पाटील यांनी भरला आहे.

१. करदात्याचे नाव - संजय ज्ञानदेव पाटील

(डीवायपी सिटी मॉल)

सर्वे नंबर - २०१४/१५ , भू. क्र. १

असेसमेंट नंबर - २५१८१

साल भरलेली तारीख भरलेली रक्कम

२०१४-१५ ११.१२.२०१४ १६,०८,०८१

२०१६-१७ १८.०८.२०१६ ९, ९९,९९९

२०१६-१७ ०८.०९.२०१६ १०,००,०००

२०१६-१७ ३१.०३. २०१७ ७३,३२,२९८

२०१७-१८ ०८.१२.२०१७ ३८,८७,०४५

२०१७-१८ ११-१२-२०१७ १,२३,७२७

२०१८-१९ ३०-०६-२०१८ १ रुपया

२०१८-१९ ३०-०६-२०१८ ३६,९५,६३२

२०१९-२० ३०-०६-२०१९ ३७,२१,८४४

२०२०-२१ २५-०६-२०२० ३१,९४,९७३

एकूण २,५५,५४,३२५

२. करदात्याचे नाव - डी. वाय. पाटील हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. तर्फे डायरेक्टर पृथ्वीराज संजय पाटील

सर्वे नंबर - २१०४/ १५ ,भू.क्र. १

असेसमेंट नंबर - २५१८२

साल भरलेली तारीख भरलेली रक्कम

२०१४-१५ ११-१२-२०१४ १०,६२,०४८

२०१५-१६ ०९-१२-२०१५ ३२,७९,५३१

२०१६-१७ २९-०८-२०१६ १६,०१,८४८

२०१६-१७ ०६-१२-२०१६ १६,०१,८४८

२०१७-१८ ३०-११-२०१७ २०,००,०००

२०१७-१८ ३१-०३-२०१८ ६,००,०००

२०१७-१८ ३१-०३-२०१८ ६,४२,४१४

२०१८-१९ २९-०९-२०१८ १६,१८,७३७

२०१८-१९ २६-१२-२०१८ १६,१७,९३२

२०१९-२० २०-०९-२०१९ १८,६६,१५३

२०१९-२० २४-१२-२०१९ १८,६६,१५२

२०२०-२१ २५-०६-२०२० ३००

२०२०-२१ २५-०६-२०२० ३५,४२, ०९९

एकूण - २,१३,१९,०६१

-प्रशासकांकडून चौकशी सुरू -

महाडिक यांनी केलेल्या आरोपानुसार, तसेच दिलेल्या पुराव्यानुसार प्रशासक डाॅ. कादंबरी बलकवडे यांनी त्याची चौकशी सुरू केली आहे. सहायक आयुक्त विनायक औंधकर यांना भाडे करारपत्र रजिस्ट्रार कार्यालयाकडून मिळविण्याचे, तसेच त्याची छाननी करण्याचे आदेश बलकवडे यांनी दिले आहेत; परंतु रजिस्ट्रार कार्यालयातील संबंधित अधिकारी रजेवर असल्यामुळे ही कागदपत्रे मिळण्यात अडचण झाली आहे.

दिवाकर कारंडे यांनी दिली नोटीस-

तत्कालीन करनिर्धारक व संग्राहक दिवाकर कारंडे यांनी डीवायपी सिटी मॉल व्यवस्थापनास नोटीस देऊन भाडे करारपत्राची मागणी केली होती. हे पत्र महापालिकेच्या रेकॉर्डला आहे; परंतु व्यवस्थापनाने करारपत्र दिली नाहीत. ती का दिली नाहीत, दिली असतील तर कोठे गेली हे प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाले आहेत.